अशा लोकांसाठी इथे 5 भन्नाट डेस्टिनेशन्स दिलेले आहेत. जे भारतात आहेत आणि एकदा तरी त्या ठिकाणांना नक्कीच भेट द्यावी इतके सुंदर आहेत. तुम्हालाही जर गोव्याव्यतिरिक्त एखादं बीच पाहायचं असेल तर तुम्ही 5 बीच डेस्टिनेशनपैकी एक निवडू शकता. हे बीचेस तुम्हाला नक्कीच आवडतील.
गोकर्ण बीच : कर्नाटकमधील गोकर्ण बीच साहसी प्रेमींसाठी बेस्ट आहे. इथे तुम्हाला ट्रेकिंगचे मार्ग आणि नयनरम्य समुद्र दृश्य पाहायला मिळतील. गोव्यापेक्षा कमी गर्दी असलेल्या या समुद्रकिनारी शांत आणि निवांत वातावरण असतं. इथे तुम्ही फॅमिलीसोबतही आनंदाने वेळ घालवू शकता.
advertisement
लक्षद्वीप : तुम्हाला भारतातच मालदीवचा अनुभव घ्यायचा असेल तर या बीचपेक्षा सुंदर पर्याय असूच शकत नाही. स्वच्छ, निळंशार, नितळ पाणी आणि पांढरी वाळू हे लक्षद्वीपच्या सुंदर समुद्र किनाऱ्याचं वैशिष्ठय आहे. लहान बेटांचा हा समूह त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो. इथे तुम्ही वॉटर स्पोर्ट्सदेखील करू शकता.
अलिबाग : मुंबई आणि पुण्याला राहणाऱ्या लोकांना या बीचबद्दल तर माहिती असेलच. इथे वीकेंडला प्रवाश्यांची खूप गर्दी असते. मुंबई-पुण्याचा लोकांचा हा आवडता विकेंड गेटवे आहे. इथे तुम्हाला सुंदर समुद्र किनाऱ्यासोबतच काही ऐतिहासिक किल्ल्यांचाही अनुभव घेता येतो. इथे अलिबाग बीचसोबत वारसोली बीच आणि नागाव बीच असे आणखीही काही बीचेस आहेत.
पाँडिचेरी : हे ठिकाण गोव्याइतकं गर्दीच नाही. इथे तुम्हाला शांतता अनुभवायला मिळेल. इथे तुम्हाला फ्रेंच संस्कृती आणि भारतीय परंपरेचा संगम पाहायला मिळेल. इथला प्रोमेनेड बीच संध्याकाळच्या दृश्यांसाठी आणि फिरण्यासाठी प्रसिद्ध आहे. इथला पॅराडाईज बीच त्याच्या सोनेरी वाळू आणि बोटींगसाठी प्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला फ्रेंच गल्ल्या आणि रंगीबेरंगी घरं पाहायला मिळतील.
वर्कला बीच : केरळचा वर्कला बीचही तितकाच अद्वितीय आहे. हे ठिकाण शांतता आणि आध्यात्मिक वातावरणाचा संगम आहे. या बिच्चे सौंदर्य आणि इथले धार्मिक वातावरण तुमच्या मनाला नक्कीच शांतता देतील.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
