तुमचं रेल्वेत आरक्षण नसल्यास किंवा विना तिकीट प्रवास करत असल्यास, भारतीय रेल्वेच्या या कायद्यानुसार, तुम्ही काही अटींसह प्रवास सुरू ठेवू शकता. या अंतर्गत प्रवास करण्यासाठी तुमच्याकडे संबंधित स्थानकाचे प्लॅटफॉर्म तिकीट असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे प्लॅटफॉर्म तिकीट असेल तर तुमचा प्रवास देखील कायदेशीररित्या वैध मानला जाईल. यासाठी तुम्ही अतिरिक्त दंड भरून तुमचा प्रवास सुरू ठेवू शकता.
advertisement
म्हणून नियम अस्तित्वात
त्याचप्रमाणे एखादी अविवाहित तरुणी किंवा महिला विना तिकीट ट्रेनमध्ये प्रवास करत असेल तर टीटीई तिला ट्रेनमधून उतरवून देऊ शकत नाही. भारतीय रेल्वेचा असाही नियम आहे की जर एखादी महिला ट्रेनमध्ये एकटी प्रवास करत असेल आणि तिच्याकडे तिकीट नसेल तर TTE तिला ट्रेनमधून खाली उतरवू शकत नाही. जर महिलेकडे पैसे असतील तर ती दंड भरून तिचा प्रवास सुरू ठेवू शकते. महिलेकडे पैसे नसले तरी टीटीई तिला डब्यातून बाहेर काढू शकत नाही.
वाचा - रक्तदाबाचा त्रास आहे? काय खावं किंवा काय खाऊ नये? पाहा तज्ज्ञ काय सांगतात
प्रवाशांचे तर सोडा, रेल्वे कर्मचाऱ्यांनाही रेल्वेच्या या कायद्याची माहिती नाही. रेल्वेने 1989 साली एक कायदा केला आहे, ज्यानुसार कोणत्याही स्थानकावर एकट्याने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाला उतरवल्यास अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकट्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेने आपल्या नियमांमध्ये बदल केले होते.
TTE काय करतात?
याबाबत रेल्वेच्या टीटीईचे म्हणणे आहे की, असे प्रकरण आमच्याकडे आल्यावर आम्ही त्याची माहिती झोनल कंट्रोल रूमला देतो. नियंत्रण कक्षाला महिलेची सद्यस्थिती आणि ती महिला कोणत्या परिस्थितीत प्रवास करत आहे याची माहिती दिली जाते. आम्हाला हे प्रकरण संशयास्पद वाटल्यास आम्ही ही माहिती जीआरपीला देतो आणि जीआरपी लेडी कॉन्स्टेबलला जबाबदारी देते.