रक्तदाबाचा त्रास आहे? काय खावं किंवा काय खाऊ नये? पाहा तज्ज्ञ काय सांगतात
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:News18 Marathi
Last Updated:
ज्या लोकांना कमी रक्तदाब किंवा उच्च रक्तदाब असेल अशा व्यक्तींचा आहार हा चांगला असावा. म्हणून अशा लोकांनी नेमकं काय खावं किंवा काय खाऊ नये पाहा
आजकालच्या जीवनशैलीमुळे अनेक लोकांना रक्तदाबाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. तसेच यामुळे अनेक समस्या होत असतात. ज्या लोकांना कमी रक्तदाब किंवा उच्च रक्तदाब असेल अशा व्यक्तींचा आहार हा चांगला असावा. म्हणून अशा लोकांनी नेमकं काय खावं किंवा काय खाऊ नये, हे जाणून घेण्यासाठी लोकल18 च्या टीमने आहारतज्ज्ञ मंजू मठाळकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली.
advertisement
advertisement
advertisement
रोजच्या जेवणामध्ये पालेभाज्या,कडधान्य, नट्स यांचा समावेश असावा. यामुळे तुम्हाला B12 हे व्हिटामिन मिळते. त्यासोबतच तुमच्या आहारामध्ये दुध आणि दुधाच्या पदार्थांचा समावेश करावा. यामुळे देखील रक्तदाब नियंत्रणात यायला मदत होते. त्यासोबतच नाचणी, राजगिरा, स्प्राऊट, कडधान्य यांचाही आहारात समावेश करावा. त्यासोबतच नारळ पाणी, लिंबू पाणी, गाजराचा ज्यूस हेदेखील दररोज घ्यायला हवे.
advertisement
advertisement






