कोरोनाच्या काळात देशभरात घरून काम करण्याची म्हणजेच work from home ची संस्कृती झपाट्यानं वाढली. आता "सायलेंट को-वर्किंग स्पेसेस" चा ट्रेंड झपाट्यानं वाढतो आहे. बदलत्या काळानुसार, लोकांच्या काम करण्याच्या पद्धती देखील बदलत आहेत.
काम करताना शांतपणे करता यावं, गजबज टाळता यावी यासाठी हा एक उत्तम आणि किफायतशीर मार्ग आहे. सायलेंट को-वर्किंग स्पेस म्हणजेच एक सामायिक कार्यक्षेत्र. पूर्णपणे शांत आणि ध्वनीरोधक असण्यासाठी अशा जागा आता डिझाईन केल्या आहेत.
advertisement
शांत वातावरणात, गोंगाटापासून दूर काम करण्यासाठी, अशा जागांची निर्मिती करण्यात येते. ग्रंथालयासारख्या शांत ठिकाणी, जिथे लक्ष केंद्रित करू शकता आणि कोणत्याही व्यत्ययाशिवाय काम करू शकता. यामधे, अनेक लोक एकत्र असले तरी हेडफोन लावून काम करतात आणि न बोलता दोन-तीन तासांत सतत काम करतात, मधल्या काळात विश्रांतीसाठी लहान ब्रेक घेतात.
Thyroid : थायरॉईडमुळे वजन वाढतं पण का वाढतं ? जाणून घ्या शास्त्रीय कारण
फ्रिलांसर, घरून काम करणारे अनेकजण आणि लेखन, कोडिंग किंवा इतर महत्त्वाच्या कामांसाठी शांत वातावरणाची आवश्यकता असलेल्या प्रत्येकासाठी अशा जागा उत्तम आहेत.
'सायलेंट को-वर्किंग स्पेसेस' अशी कार्यक्षेत्रं तयार करताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो. सहसा, मोठ्या सहकारी कार्यालयात एक वेगळं शांत क्षेत्र तयार केलं जातं किंवा एकट्यानं काम करण्यासाठी लहान, बंद, शांत केबिन तयार केल्या जातात, जिथे लोक शांततेत काम करू शकतात.
या प्रकारच्या कामकाजाच्या वातावरणाचा प्राथमिक उद्देश कामाचा वेग आणि उत्पादकता वाढवणं, आवाजाचा ताण कमी करणं आणि लक्ष विचलित न होता काम करण्यासाठी लक्ष केंद्रित करणं हा आहे. त्यामुळेच, शांत आणि आलिशान वातावरणात काम करण्याचा ट्रेंड सध्या लोकप्रिय पर्याय होतो आहे.
Sugary Drinks : शुगरी ड्रिंक्सपासून राहा दूर, मानसिक आजाराचं ठरतंय कारण
या कार्यक्षेत्राची निर्मिती करण्याचा प्राथमिक उद्देश शांतता प्रदान करणं आहे. म्हणून, जर तुम्ही शांत सह-कार्यस्थळी काम करत असाल, तर तुम्हीही शांतता राखाल याची खात्री करा.
एकमेकांशी न बोलता, फोन सायलेंट मोडवर ठेवावा आणि कीबोर्डवर जोरजोरात टाइप करणं टाळावं अशी अपेक्षा आहे, जेणेकरून इतर कोणालाही एकत्र काम करताना त्रास होऊ नये.
एखाद्या ठिकाणी जाऊन शांत वातावरणात, एकाग्रतेनं काम करण्यासाठी आवश्यक सुविधा "सायलेंट को-वर्किंग स्पेसेस" मधे पुरवल्या जातात. याची नोंदणी आणि शुल्क पद्धतही असते.
