दरवर्षी 8 मार्चला महिला दिन उत्साहात साजरा केला जातो; मात्र 19 नोव्हेंबरचा जागतिक पुरुष दिन शासनालाच विस्मरणात जात असल्याचे चित्र आश्रमाने मांडले. संविधानात स्त्री-पुरुष समान मानले असतानाही अनेक कायदे व धोरणे महिलांच्या बाजूने झुकत असल्याने पुरुषांवर अन्याय वाढत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे अनेक पुरुष मानसिक, सामाजिक आणि आर्थिक संकटात सापडत असून, परिस्थिती हाताबाहेर गेल्याने काही जण टोकाचा मार्गही स्वीकारत असल्याचे आश्रमाचे म्हणणे आहे. विवाहसंस्था ढासळत चालल्याचे आणि खोट्या तक्रारींमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
advertisement
पुरुषांना आपली वेदना मांडण्यासाठी सक्षम व्यासपीठ नसल्याने ही स्थिती अधिकच गंभीर होत चालल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. त्यामुळे न्याय्य, लिंगनिरपेक्ष आणि संतुलित कायदे होण्यासाठी समाजाचे तसेच शासनाचे लक्ष वेधणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.आजच्या आंदोलनात आश्रमातील सदस्य शीर्षासन करत आहेत. “शासन आमच्या वेदना ऐकत नाही, म्हणून आम्हीच उलटे झालो,” असे सांगत त्यांनी या अनोख्या पद्धतीने जगाला पुरुषांच्या समस्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.ऍड भरत फुलारे म्हणले आहेत.