TRENDING:

Shocking : शाळा की मसाज पार्लर? मुख्याध्यापिकेने विद्यार्थिनीकडून करून घेतला 'मसाज'; संतापजनक प्रकाराचा Video Viral

Last Updated:

एका सरकारी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेने चक्क शाळेच्या वेळेत एका पाचवीतील विद्यार्थिनीकडून पाय चेपून घेतल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकारामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, प्रशासनाने तातडीने कठोर पाऊल उचलले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : शाळा हे ज्ञानाचं मंदिर मानलं जातं आणि शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणारे शिल्पकार असतात. आपल्या पाल्याला शाळेत पाठवताना पालकांचा विश्वास असतो की, तिथे त्यांना केवळ शिक्षणच नाही तर चांगले संस्कारही मिळतील. पण, जेव्हा हेच 'शिल्पकार' आपल्या अधिकाराचा गैरवापर करून चिमुरड्या हातांना अभ्यासाऐवजी आपले पाय चेपायला लावतात, तेव्हा समाजाचा व्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत होतो. अशीच एक संतापजनक घटना उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यातून समोर आली आहे.
Viral video
Viral video
advertisement

एका सरकारी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेने चक्क शाळेच्या वेळेत एका पाचवीतील विद्यार्थिनीकडून पाय चेपून घेतल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकारामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, प्रशासनाने तातडीने कठोर पाऊल उचलले आहे.

नेमकं प्रकरण काय?

चित्रकूट जिल्ह्यातील कर्वी येथील नया बाजार भागातील एका सरकारी प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला. सोशल मीडियावर सध्या 23 सेकंदांची एक क्लिप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुख्याध्यापिका मधू राय या वर्गातील जमिनीवर आरामात पडलेल्या दिसत आहेत आणि आरामात मोबाईल वापरत आहेत. त्याच वेळी, शाळेच्या गणवेशातील एक लहान मुलगी त्यांच्या कंबरेवर आणि अंगावर उभं राहून मसाज देत होती. तर इतर मुली बाकांवर बसून हे सर्व पाहत आहेत.

advertisement

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वच स्तरातून टीकेचा झोड उठली. सोशल मीडियावर लोकांनी विचारले की, "ज्या मुख्याध्यापिकेने मुलांचे भविष्य घडवायचे, तीच जर मुलांचे असे शोषण करत असेल, तर शिक्षण व्यवस्थेचे काय होणार?"

तपासात धक्कादायक खुलासे

हा प्रकार उघडकीस येताच 'बेसिक शिक्षा अधिकारी' (BSA) बी. के. शर्मा यांनी तातडीने एका पथकाला शाळेत तपासणीसाठी पाठवले. यावेळी पथकाने विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांनी आणखीनच धक्कादायक माहिती दिली. विद्यार्थ्यांनी पथकाला सांगितले की, मुख्याध्यापिका मधू राय या नियमितपणे विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारे मसाज करून घेत असत.

advertisement

तपासणी अहवालात विद्यार्थ्यांचे आरोप सिद्ध झाल्याचे समोर आले. यानंतर बी. के. शर्मा यांनी मुख्याध्यापिका मधू राय यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे, मधू राय या येत्या एक-दोन वर्षात मुख्याध्यापिका पदावरून निवृत्त होणार होत्या, त्यापूर्वीच या गैरवर्तनामुळे त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे.

advertisement

मुख्याध्यापिकेचा अजब दावा: "हा व्हिडिओ AI ने बनवलाय"

एकिकडे पुरावे विरोधात असताना, मुख्याध्यापिका मधू राय यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्या बचावात त्यांनी एक अजब दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, "हा व्हिडिओ बनावट असून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) टूल्सच्या मदतीने तो 'डॉक्टर्ड' म्हणजेच छेडछाड करून तयार करण्यात आला आहे." मात्र, प्रत्यक्षदर्शी विद्यार्थी आणि तपासणी अहवालामुळे त्यांचा हा दावा फोल ठरल्याचे दिसत आहे.

व्हिडिओ कुणी शूट केला?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा लेक अधिकारी, क्लासेसचा आधार न घेता मिळवलं यश, UPSC परीक्षेत 434 रँक
सर्व पहा

सोशल मीडियावर या प्रकरणावरून संताप व्यक्त होत असतानाच काही युजर्सनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे की, "जर हा व्हिडिओ वर्गातील आहे, तर तो नेमका शूट कुणी केला?" यामागे शाळेतीलच एखादा कर्मचारी आहे की बाहेरील व्यक्ती, याचाही तपास आता सुरू आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Shocking : शाळा की मसाज पार्लर? मुख्याध्यापिकेने विद्यार्थिनीकडून करून घेतला 'मसाज'; संतापजनक प्रकाराचा Video Viral
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल