TRENDING:

Walking: दररोज किती मिनिटं चाललं पाहिजे? 30 दिवसांमध्ये जाणवले असा शरिरावर परिणाम

Last Updated:

नियमित चालण्यानं आपल्या शरीरातील रक्तप्रवाह वाढतो आणि शरीराच्या सर्व अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तब्येत चांगली ठेवायची असेल तर चालणं अत्यावश्यक आहे. पण लगेच खूप चालण्यापेक्षा हळूहळू वेग आणि वेळ वाढवणं हा चांगला पर्याय आहे. त्यासाठी, सुरुवातीच्या दिवसांमध्ये, तुम्ही दररोज 15 मिनिटं चालायला सुरुवात करा. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी चालू शकता.
झोप पूर्ण होण्यासह दिवसभरातून 5 तासांची हालचालही महत्त्वाची असते. मग हे पूर्ण 5 तास तुम्ही उभंच राहायला हवं असं काही नाहीये. या 5 तासात तुम्ही चालू शकता, जॉगिंग करू शकता, योगासनं करू शकता. तसंच 1 तासापेक्षा जास्त वेळ एका जागी उभं राहिल्याने तुम्हाला त्रासही होऊ शकतो.
झोप पूर्ण होण्यासह दिवसभरातून 5 तासांची हालचालही महत्त्वाची असते. मग हे पूर्ण 5 तास तुम्ही उभंच राहायला हवं असं काही नाहीये. या 5 तासात तुम्ही चालू शकता, जॉगिंग करू शकता, योगासनं करू शकता. तसंच 1 तासापेक्षा जास्त वेळ एका जागी उभं राहिल्याने तुम्हाला त्रासही होऊ शकतो.
advertisement

जीवनशैलीत सतत बदल होत असल्यामुळे निरोगी राहणं आव्हानात्मक ठरतंय. पण चालणं हा एक असा व्यायाम आहे जो केवळ आपलं शरीर निरोगी ठेवत नाही तर आपलं मानसिक आरोग्य देखील सुधारतो. नियमित चालण्यानं आपल्या शरीरातील रक्तप्रवाह वाढतो आणि शरीराच्या सर्व अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळतो. याशिवाय चालण्यानं आपलं वजन नियंत्रणात राहतं. त्यामुळे जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर तुम्ही 30 दिवस चालायचं ठरवा तुम्हाला फरक नक्की दिसेल.

advertisement

Tea: चहा, कॉफी सोडायचा विचार करताय? दिवसाची सुरुवात करण्यासाठी हे आहेत आणखी पर्याय

15 मिनिटं चालण्यापासून सुरुवात करा:

सुरुवातीच्या दिवसांमध्ये, तुम्ही दररोज 15 मिनिटं चाललं पाहिजे. या काळात वेगानं चालणं टाळा. दर आठवड्याला चालण्याचा वेळ १५ मिनिटांनी वाढवा.यानंतर, आपण दुसऱ्या आठवड्यात चालण्याची वेळ वाढवू शकता. एका आठवड्यानंतर, दररोज 30 मिनिटं चालणं सुरू करा. यामुळे तुमच्या शरीरातील रक्त प्रवाह वाढेल आणि तुमचं मानसिक आरोग्य सुधारेल.

advertisement

मुलींना कमी वयातच येतेय पहिली मासिक पाळी; डॉक्टरांनी सांगितलेल्या कारणाने काळजी वाढवली

तिसऱ्या आठवड्यात, चालण्याचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवा. म्हणजेच, दररोज 30 मिनिटांऐवजी 45 मिनिटं चालणं सुरू करा. यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहील. यानंतर, चौथ्या आठवड्यात तुम्ही तुमच्या चालण्याचा कालावधी आणखी 15 मिनिटांनी वाढवू शकता. तीन आठवड्यांनंतर, चौथ्या आठवड्यात तुम्हाला दररोज एक तास म्हणजे 60 मिनिटं चाला.

advertisement

चालण्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. तसंच रक्तदाब कमी होण्यास मदत होते. शरीरातील हाडांची आणि स्नायूंची शक्ती वाढते. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही चालणं उपयुक्त आहे. चालल्यामुळे संपूर्ण शरीराची ऊर्जा वापरली जाते. एकूणच संपूर्ण आरोग्यासाठी चालणं हा सर्वोत्तम व्यायाम आहे.

advertisement

या गोष्टी लक्षात ठेवा:

चालण्यासोबतच काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. खूप वेगान चालणं टाळा. चालताना पायांना आराम देण्यासाठी आरामदायक शूज घाला. यासोबतच शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी प्या.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Walking: दररोज किती मिनिटं चाललं पाहिजे? 30 दिवसांमध्ये जाणवले असा शरिरावर परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल