मुलींना कमी वयातच येतेय पहिली मासिक पाळी; डॉक्टरांनी सांगितलेल्या कारणाने काळजी वाढवली

Last Updated:

आता कमी वयातच मुलींना पाळी येणं सुरू झालं आहे. आजकाल बहुतांश मुलींना वयाच्या नऊ ते 10व्या वर्षादरम्यान पहिली मासिक पाळी येत आहे.

नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, हा प्रकार मुलींच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.
नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, हा प्रकार मुलींच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.
प्रत्येक मुलीला ठराविक वयानंतर दर महिन्याला मासिक पाळी म्हणजेच पिरियड्स येतात. प्रत्येक महिन्यात साधारण 28 दिवसांच्या कालावधीनंतर पिरियड्स येतात. हा कालावधी स्त्रियांची दिनचर्या आणि हॉर्मोन्सच्या संतुलनानुसार कमी-जास्त होऊ शकतो. काही दशकांपूर्वी मुलींना वयाच्या 13 ते 15 वर्षांदरम्यान पहिली मासिक पाळी येत असे. मात्र, आता कमी वयातच मुलींना पाळी येणं सुरू झालं आहे. आजकाल बहुतांश मुलींना वयाच्या नऊ ते 10व्या वर्षादरम्यान पहिली मासिक पाळी येत आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, हा प्रकार मुलींच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. 'आज तक'ने या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
यूएसनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थच्या (एनआयएच) संशोधकांनी सुमारे10 हजार एन्व्हायर्नमेंटल कम्पाउंड्सची तपासणी केली. त्या असं आढळलं की, सध्याच्या लाईफस्टाइलमध्ये अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे ज्यामुळे मुलींना कमी वयात मासिक पाळी येऊ शकते. त्यांनी सांगितलं की, मस्क ॲम्ब्रेटसारखी कम्पाउंड्समध्ये मेंदूतील रिसेप्टर्सना उत्तेजित करण्याची क्षमता असते. अनेक पर्सनल केअर प्रॉडक्ट्समध्ये मस्क ॲम्ब्रेटचा वापर केला जातो.
advertisement
संशोधनातून असं लक्षात आलं की, घरगुती उत्पादनांमधील काही रसायनांच्या संपर्कात आल्याने मुलींना वेळेपूर्वी मासिक पाळी येण्याचा धोका असतो. यामध्ये डिटर्जंट, परफ्युम, साबण आणि इतर उत्पादनांमध्ये आढळणाऱ्या रसायनांचा समावेश आहे. एंडोक्रिनॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, कोलिनर्जिक अ‍ॅगोनिस्ट नावाच्या औषधांमुळे देखील मासिक पाळी लवकर सुरू होते. या कम्पाउंड्सना 'हॉर्मोन-डिसरप्टर्स' किंवा 'एंडोक्राइन-डिसरप्टर्स' म्हणतात. यामुळे मुलींच्या शरीरातील हॉर्मोनल फंक्शन बिघडू शकतं.
advertisement
संशोधकांच्यामते, मुलींमध्ये मासिक पाळी लवकर येण्याची अनेक कारणं आहेत. लठ्ठपणा, तणाव आणि कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स यांचा देखील यात समावेश होतो. लहानपणापासूनच लठ्ठ असलेल्या मुलींना मासिक पाळी लवकर येण्याचा धोका खूप जास्त असतो. जास्त तणावाखाली असताना मुलींच्या शरीरात अधिक कॉर्टिसॉल आणि एंड्रोजनहॉर्मोन्स रिलीज होतात. फॅट टिश्यू या हार्मोन्सचे इस्ट्रोजेनमध्ये रूपांतर करतात. परिणामी, मुलींच्या स्तनाचा आकार वाढतो. हा बदल मासिक पाळी सुरू झाल्याचा संकेत आहे.
advertisement
संशोधकाचं म्हणणं आहे की, पालकांनी मुलींना फळे आणि भाज्यांनी समृद्ध असलेला आहार दिला पाहिजे. आहारासोबतच नियमित व्यायाम आणि पुरेशी झोपही खूप महत्त्वाची आहे. या दोन्ही गोष्टींची काळजी घेतल्यास कमी वयात मासिक पाळी येण्याचा धोका कमी होऊ शकतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
मुलींना कमी वयातच येतेय पहिली मासिक पाळी; डॉक्टरांनी सांगितलेल्या कारणाने काळजी वाढवली
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement