तुम्हीही जोडीदाराचा टुथब्रश वापरता? प्रेम तर नाही, पण HIV चा धोका नक्कीच वाढेल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
बहुतेक घरांमध्ये असे आढळते की घरातील लोक एकमेकांचे टुथब्रश वापरतात. मात्र असे करणे ओरल हेल्थच्या दृष्टीने अतिशय घातक आहे.
आपण आपल्या भावंडांसह अनेक गोष्टी शेअर करत असतो. आपल्याला पालकांकडूनही सर्व गोष्टी मिळून-मिसळून वापरण्यास शिकवले जाते. एकमेकांच्या गोष्टी वापरणे किंवा त्यांच्यासोबत अन्न वाटून खाणे ही चांगली सवय मानली जाते. मात्र जेव्हा गोष्ट टुथब्रशची असते, तेव्हा आपली हीच सवय त्रासदायक ठरू शकते. बहुतेक घरांमध्ये असे आढळते की घरातील लोक एकमेकांचे टुथब्रश वापरतात. मात्र असे करणे ओरल हेल्थच्या दृष्टीने अतिशय घातक आहे.
डेंटिस्ट डॉक्टर निशा ठक्कर यांनी सांगितल्यानुसार आपल्या तोंडात चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे बॅक्टेरिया असतात. जेव्हा आपण आपले ब्रश घरातील इतर कोणत्याही सदस्याबरोबर शेअर करतो तेव्हा या बॅक्टेरियांचे आदान-प्रदान होते. यामुळे ओरल हेल्थसंबंधी अनेक समस्या उद्भवू शकतात. आज आपण तज्ज्ञांकडूनच या सवयीमुळे होणारे नुकसान समजून घेऊया.
advertisement
इतरांसोबत आपला टूथब्रश का शेअर करू नये?
तुम्ही तुमचा टूथब्रश इतरांसोबत शेअर केल्याने तुम्ही त्यात असलेले बॅक्टेरियाही इतरांसोबत शेअर करता. अशा टूथब्रशमुळे हिरड्यांचे आजार आणि तोंडाच्या गंभीर संसर्गाचा धोका वाढतो. टूथब्रश शेअर केल्याने तुमच्या तोंडातील बॅक्टेरिया संबंधित व्यक्तीकडे हस्तांतरित होऊ शकतात आणि त्याचे ओरल हेल्थ बिघडू शकते.
तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, टूथब्रशवर स्ट्रेप्टोकोकस म्युटान्स आढळतात. हा एक हानिकारक जीवाणू आहे जो अनेक प्रकारच्या संसर्ग आणि दात किडण्यासाठी जबाबदार आहे. जेव्हा तुम्ही टूथब्रश इतरांसोबत शेअर करता तेव्हा हानिकारक संसर्ग होण्याची शक्यता असते.
advertisement
टूथब्रश शेअर केल्याने तोंडाच्या कोणत्या आजारांचा धोका वाढू शकतो?
- तोंडात आढळणाऱ्या काही बॅक्टेरियांमुळे न्यूमोनियासारखे संक्रमण होऊ शकते. टूथब्रश शेअर केल्याने हे जीवाणू पसरण्याचा धोका वाढतो.
advertisement
जर तुम्ही तुमचा ब्रश कोणाबरोबरही शेअर केला नाही तर तुम्ही तोंडाचे आरोग्य चांगले ठेवू शकता. टूथब्रश शेअर केल्याने जवळीकीची भावना येते पण त्यामुळे दोन व्यक्तींचे आरोग्यही बिघडू शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 15, 2024 11:01 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
तुम्हीही जोडीदाराचा टुथब्रश वापरता? प्रेम तर नाही, पण HIV चा धोका नक्कीच वाढेल