झोपताना उशी घ्यावी की नाही, तुम्हीही आहात कंफ्यूज? तज्ज्ञांनी काय सांगितलं पाहा

Last Updated:

उशी घेऊन झोपायचं की नाही याबाबत अनेकांचं मत वेगवेगळं आहे. काहींना असे वाटते की उशी घेऊन झोपणे आरोग्यासाठी घातक आहे तर काहींना याउलट वाटते.

उशी घेऊन झोपायचं की नाही याबाबत अनेकांचं मत वेगवेगळं आहे. काहींना असे वाटते की उशी घेऊन झोपणे आरोग्यासाठी घातक आहे तर काहींना याउलट वाटते.
उशी घेऊन झोपायचं की नाही याबाबत अनेकांचं मत वेगवेगळं आहे. काहींना असे वाटते की उशी घेऊन झोपणे आरोग्यासाठी घातक आहे तर काहींना याउलट वाटते.
प्रत्येकाची झोपायची पद्धत वेगवेगळी असते. कोणी चटई, चादर अंथरूण झोपतात, तर काहींना मऊ गादी आणि ब्लँकेट घेऊन झोपायला आवडते. रात्री झोपताना उशी घेऊन झोपणे अतिशय सामान्य गोष्ट आहे. प्रत्येकजण त्यांच्या आवडीनुसार आपली उशी निवडतात. तथापि उशी घेऊन झोपायचं की नाही याबाबत अनेकांचं मत वेगवेगळं आहे. काहींना असे वाटते की उशी घेऊन झोपणे आरोग्यासाठी घातक आहे तर काहींना याउलट वाटते. आज आपण याबाबतच्या खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, ज्या लोकांना पोटावर झोपायला आवडते, त्यांच्यासाठी उशी न घेता झोपणे फायदेशीर ठरू शकते. अमेरिकेच्या रोचेस्टर मेडिकल सेंटर विद्यापीठातील तज्ज्ञांनुसार पोटावर झोपल्याने आपल्या मणक्याची नैसर्गिक स्थिती बदलते. कारण यावेळी आपल्या शरीराचे बहुतांश वजन शरीराच्या मधल्या भागावर असते. यामुळे आपली पाठ आणि मानेवर ताण पडतो. अशा परिस्थितीत उशी न घेता झोपल्यास आपले डोके सरळ राहते आणि मानेवरील ताणही कमी होतो.
advertisement
दरम्यान, तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, उशी न घेऊन झोपणे प्रत्येकासाठी उपयुक्त नाही. जर तुम्ही झोपेत सतत कुस बदलत असाल तर उशी नसल्यास फायद्याच्या जागी नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. अशा लोकांनी झोपताना उशीचा वापर केला नाही तर त्यांची मान आणि खांद्यांवर भार येतो. आपल्या मणक्याचे हाड तठस्थ ठेवण्यासाठी उशीचा वापर करायला हवा. इतकंच नाही तर ज्या लोकांना मानदुखीचा त्रास जाणवतो त्यांनी आवर्जून झोपताना उशी घ्यावी. झोपताना उशी घेतल्याने मानेला आधार मिळतो आणि झोपताना योग्य स्थिती राहते. यामुळे झोपमोड होऊ शकते.
advertisement
तज्ज्ञांनी सांगितले की योग्य उशीचा वापर केल्यास मणक्यासंबंधित आजार दूर होऊ शकतात. मात्र अनेक लोकांना उशी घेऊन झोपण्याची सवय नसते. जर एखाद्याला उशी न घेताही चांगली झोप लागत असेल आणि त्यांना कोणताही त्रास जाणवत नसेल तर झोपताना उशी घेऊन झोपावे की नाही हे त्यांच्या आवडीवर अवलंबून आहे. तुम्हालाही जर झोपताना काही त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते.
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
झोपताना उशी घ्यावी की नाही, तुम्हीही आहात कंफ्यूज? तज्ज्ञांनी काय सांगितलं पाहा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement