advertisement

पायलटने मुद्दाम इंजिनचा इंधन पुरवठा बंद केला? Air India अपघाताबाबत खळबळजनक खुलासा

Last Updated:

Air India Plane Crash: जून २०२५ मध्ये अहमदाबाद विमानतळावर झालेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान अपघाताबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे.

News18
News18
Air India Plane Crash: जून २०२५ मध्ये अहमदाबाद विमानतळावर झालेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान अपघाताबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. इटालियन वृत्तपत्र 'कॉरिअर डेला सेरा'ने दिलेल्या वृत्तानुसार, हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे नाही, तर जाणूनबुजून केलेल्या कृत्यामुळे (Intentional Act) झाला असल्याचा निष्कर्ष तपास यंत्रणांनी काढला आहे. ही बातमी समोर येताच खळबळ उडाली आहे.

इंजिनचा इंधन पुरवठा मुद्दाम बंद केला?

तपासाशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमानाचा इंधन पुरवठा तांत्रिक बिघाडामुळे खंडित झाला नव्हता, तर तो मॅन्युअली म्हणजेच हाताने बंद करण्यात आला होता. त्यामुळेच हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच हे कृत्य करण्यात आलं. ज्यामुळे विमानाचं इंजिन बंद पडलं आणि विमान खाली कोसळल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.
advertisement

२६० जणांचा बळी आणि ब्लॅक बॉक्समधील 'तो' संवाद

या भीषण अपघातात प्रवासी आणि ज्या वैद्यकीय वसतिगृहावर विमान पडले त्यातील विद्यार्थी मिळून एकूण २६० जणांचा मृत्यू झाला होता. जुलै २०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या प्राथमिक अहवालात कॉकपिटमधील शेवटच्या संवादाचा उल्लेख करण्यात आला होता. ब्लॅक बॉक्स रेकॉर्डिंगनुसार, एक पायलट विचारत होता, "तू इंधन पुरवठा का बंद केलास?" त्यावर दुसऱ्याने उत्तर दिलं होतं की, "मी असं काही केलं नाही." या संवादावरून तपास यंत्रणांचा संशय अधिक बळावला आहे.
advertisement

संशयाची सुई कॅप्टन समीर सभरवाल यांच्याकडे?

या प्रकरणात मुख्य संशय कॅप्टन समीर सभरवाल यांच्यावर जात आहे. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, कॅप्टन सभरवाल हे नैराश्याने ग्रस्त होते. मात्र, कॅप्टन सभरवाल यांच्या वडिलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या मुलाला मानसिक आजार किंवा घटस्फोटासारख्या वैयक्तिक समस्यांमुळे तणावात नव्हता, असा दावा त्यांनी केला असून नव्याने तपास करण्याची मागणी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
पायलटने मुद्दाम इंजिनचा इंधन पुरवठा बंद केला? Air India अपघाताबाबत खळबळजनक खुलासा
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement