अक्रोड खाण्यासाठी एक उत्तम ड्रायफ्रूट असून याशिवाय यात भरपूर कॅलरीज, प्रथिने, फॅट्स, फायबर, कार्बोहायड्रेट्स, थायामिन, व्हिटॅमिन बी 6, फोलेट, मॅंगनीज, तांबे, जस्त, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिडसारखे विशेष पोषक घटक देखील आढळतात.
सॉस आणि केचपमध्ये काय फरक असतो? 90 टक्के लोकांना माहित नाही उत्तर
advertisement
तुम्ही जर हिवाळ्यात सांधेदुखी आणि सुज येण्याने त्रस्त असाल तर अक्रोड यावर एक रामबाण इलाज आहे. मुंबई विद्यापीठाचे माजी डीन वैद्यराज दीनानाथ उपाध्याय यांच्या मते, आयुर्वेद आणि युनानी वैद्यक पद्धतीमध्ये अक्रोड विशेष मानले जाते. याच्या नियमित सेवनाने सांधेदुखी आणि सूज दूर होते. प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथ 'चरकसंहिता' मध्ये, अक्रोडला शरीरासाठी स्फूर्तिदायक मानण्यात आले आहे.
अक्रोडमधील वैशिष्ट्ये शरीराला सांधेदुखी आणि सूज येण्यापासून वाचवतात. युनानी वैद्यक पद्धतीत, शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि सांधेदुखी सारख्या वेदना टाळण्यासाठी अक्रोड खाण्याचा सल्ला दिला जातो.ओमेगा-3 फॅटी ऍसिड नावाचे पोषक तत्व अक्रोडमध्ये आढळते. जे सांधे, सूज आणि संधिवात दरम्यान होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. अक्रोड हे मेंदूसाठी देखील फायदेशीर आहे.
रात्री तहान लागून तुमची झोपमोड होते का? दुर्लक्ष करू नका 'ही' असू शकतात कारणं
अक्रोडमध्ये आढळणारे पोषक आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करून मानसिक तणाव कमी करण्यास मदत करतात. त्यात आढळणारे तेल पार्किन्सन सारख्या रोगांना प्रतिबंधित करते आणि नैराश्य आणि मानसिक थकवा दूर ठेवण्यास देखील उपयुक्त ठरते. अक्रोड खाल्ल्याने स्मरणशक्तीही सुधारेल आणि मानसिक ताण देखील कमी होईल. अक्रोड हे अँटिऑक्सिडेंटने परिपूर्ण असून त्यातील घटक हे शरीरातील खराब कोलेस्टेरॉल ची पातळी कमी करण्यास मदत करतात.