TRENDING:

अंडी उकळण्याचा 3-3-3 फाॅर्म्युला काय आहे? खरंच आरोग्यासाठी त्याचा फायदा होतो का? 

Last Updated:

3-3-3 पद्धतीने अंडं उकळल्यास ते परफेक्ट शिजतं आणि ओव्हरकूकही होत नाही. ही पद्धत अशी आहे – अंडं 3 मिनिटं उच्च आचेवर उकळा, मग गॅस बंद करून 3 मिनिटं झाकण घालून ठेवा आणि...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अंडी आरोग्यासाठी एक उत्तम सुपरफूड मानलं जातं, ज्यामध्ये प्रोटीन, विटामिन्स आणि आवश्यक पोषक तत्वं भरपूर प्रमाणात असतात. पण तुम्हाला माहित आहे का की अंडी किती वेळ उकळली जातात, यावर त्याची पौष्टिक गुणवत्ता आणि आरोग्यावर होणारे परिणाम अवलंबून असतात?
3-3-3 egg boiling method
3-3-3 egg boiling method
advertisement

योग्य प्रकारे अंडी उकळल्याने त्याची चव तर सुधारतेच, पण ते सहज पचायलाही मदत करते. आजकाल 3-3-3 अंडं उकळण्याची पद्धत खूप व्हायरल होत आहे. ज्यांना परफेक्ट उकडलेले अंडे हवे आहेत, म्हणजेच जास्त कच्चेही नाही आणि जास्त शिजलेलेही नाही, त्यांच्यासाठी ही पद्धत विशेष उपयुक्त आहे.

3-3-3 अंडी उकळण्याची पद्धत काय आहे?

ही अंडं उकळण्याची एक सोपी आणि अचूक पद्धत आहे. ही पद्धत वापरून तुम्ही प्रत्येक वेळी परफेक्ट उकडलेले अंडे बनवू शकता.

advertisement

  • पहिले 3 मिनिटे : प्रेशर कुकरमध्ये पाणी टाका आणि त्यात अंडी टाकून 3 मिनिटे मोठ्या आचेवर उकळू द्या.
  • दुसरे 3 मिनिटे : यानंतर गॅस बंद करा आणि अंड्यांना त्याच गरम पाण्यात 3 मिनिटे झाकून ठेवा.
  • तिसरे 3 मिनिटे : मग अंडं बाहेर काढा आणि त्यांना 3 मिनिटे थंड पाण्यात टाका, ज्यामुळे अंड्याचे कवच सहज निघेल आणि ते जास्त शिजणार नाहीत.
  • advertisement

योग्य प्रकारे उकळणे आरोग्यासाठी महत्त्वाचे का आहे?

जर अंडं जास्त वेळ उकळलं, तर त्यातील प्रोटीन घट्ट होऊ शकतं आणि ते पचनासाठी जड होऊ शकतं. तसेच, जास्त वेळ उकळल्यामुळे अंड्याच्या पिवळ्या भागाच्या भोवती हिरवा किंवा राखाडी रंग येऊ लागतो, जो त्याच्या पौष्टिकतेत थोडी घट झाल्याचे लक्षण असू शकते. दुसरीकडे, जर अंडं योग्य वेळी उकळलं, तर ते मऊ, सहज पचण्याजोगे आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण होतं.

advertisement

उकडलेली अंडी खाण्याचे फायदे

नाश्त्यात उकडलेली अंडी खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा मिळते आणि भूकही नियंत्रणात राहते. जर तुम्ही रोज अंडी खात असाल, तर ती उकळण्याची पद्धत योग्य ठेवा. 3-3-3 पद्धत केवळ वेळ वाचवते, तर ती हेल्दी आणि परफेक्ट उकडलेली अंडी मिळवण्याचा एक सोपा मार्ग आहे. जिममध्ये जाणारे, लहान-वृद्ध लोक आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी उकडलेली अंडी खावी.

advertisement

हे ही वाचा : अशक्तपणा दूर करायचाय? तर आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश; डाॅक्टर सांगतात...

हे ही वाचा : उन्हाळ्यात फिट राहायचंय? तर आहारात घ्या 'ही' भाजी; अनेक गंभीर आजारांपासून व्हाल मुक्त

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
अंडी उकळण्याचा 3-3-3 फाॅर्म्युला काय आहे? खरंच आरोग्यासाठी त्याचा फायदा होतो का? 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल