जे लोक वारंवार प्रवास करतात आणि हॉटेल्स बुक करतात, त्यांच्यासाठी अमेरिकेतील AAA डायमंड प्रोग्रामचे प्रादेशिक व्यवस्थापक जेमी किम्ब्रो यांनी काही उपयुक्त टिप्स दिल्या आहेत. या टिप्स वाचल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटले की, ते नेहमीच यापैकी अनेक चुका करत होते.
रूम नंबर आहे महत्त्वाचा
जेमी किम्ब्रो यांनी सांगितले की, रिसेप्शनिस्टना रूम नंबर हळू आवाजात सांगण्याचे प्रशिक्षण दिले जाते, पण कधीकधी ते मोठ्याने बोलतात. यामुळे प्रवाशांच्या गोपनीयतेला धोका निर्माण होतो आणि जर कोणी ऐकले तर सुरक्षेचा धोका वाढतो.
advertisement
जेमी यांचा सल्ला आहे : “जर असे घडले, तर लगेच नवीन रूमची मागणी करा. वैयक्तिक सुरक्षिततेसाठी रूम नंबर मोठ्याने बोलू नका, असे त्यांना सांगा.” हे लहान पाऊल तुमचा प्रवास अधिक सुरक्षित बनवू शकते.
रूममध्ये प्रवेश करताना ‘या’ गोष्टी तपासा
जेमी शिफारस करतात की, रूममध्ये प्रवेश करताच संभाव्य लपण्याची जागा तपासा - बाथरुम, वॉर्डरोब, पडद्यामागे.
- कनेक्टिंग रूम असेल, तर इंटरलॉकिंग दरवाजाची डेडबोल्ट (deadbolt) पूर्णपणे लावून घ्या.
- जर रूम योग्य वाटत नसेल, तर तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा आणि रिसेप्शनवर परत जा.
- एकदा सेटल झाल्यावर, तुमच्या मौल्यवान वस्तू तिजोरीत (safe) लॉक करा.
- रूमचा टेलिफोन तपासा. तो आपत्कालीन परिस्थितीत लाइफलाइन ठरू शकते. डायल करून सिग्नल स्पष्ट आहे का, ते तपासा.
बेड बग्सपासून (Bed Bugs) सावधान
प्रवासाच्या तज्ज्ञांकडून आणखी एक सल्ला बेड बग्स (ढेकूण) टाळण्याबद्दल आहे, जो हॉटेलच्या रूममध्ये असलेला एक लपलेला धोका आहे. ट्रॅव्हल लेखक लिडिया मॅनसेल सांगतात की, बेड बग्स मऊ फर्निचरमध्ये लपलेले असू शकतात - बेड, खुर्च्या, कार्पेट इत्यादी. त्या सल्ला देतात की चेक-इन नंतर तुमचे सामान वॉर्डरोबमध्ये ठेवण्याऐवजी बाथटबमध्ये ठेवा. यामुळे तुमचा त्रास कमी होईल आणि तुमचा प्रवास अधिक सुरक्षित होईल.
हे ही वाचा : Tourist Photography: भटकंती करून मिळणार 5 लाख रुपये! पण, कुठे आणि कसे? वाचा A टू Z माहिती
हे ही वाचा : जमिनीखालचे बोगदे, आभाळाला भिडणारे पूल! इंजिनीअरिंगचे 'हे' 10 चमत्कार; PHOTO पाहून म्हणाल, "माणूस काहीही करू शकतो"