वॉशिंग मशीनच्या क्षमतेपेक्षा जास्त कपडे त्यात धुतल्यास मोटर, ड्रम आणि बेअरिंगवर ताण येतो. त्यामुळे त्यात बिघाड होतो. कपडे धुण्यासाठी तुम्ही अतिरिक्त प्रमाणात डिटर्जंट वापरत असाल तर त्यामुळेही तुमचं वॉशिंग मशीन लवकर बिघडू शकतं. जास्त डिटर्जंटमुळे कपडे जास्त चांगले धुतले जातात असं अनेकांना वाटत असतं, प्रत्यक्षात मात्र वापरलेला जादा डिटर्जंट पावडर ही मशिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम करते, हे लक्षात ठेवा. धुतल्यानंतर उरलेली पावडर मशीनमध्ये तशीच राहते व त्यामुळे मशीन खराब होतं. वॉशिंग मशीन वापरताना लिंट फिल्टर, डिटर्जंट डिस्पेन्सर आणि ड्रम यांची नियमित स्वच्छता करणं आवश्यक आहे. तसं न करणं हे मशीनच्या कामात अडथळा आणू शकतं.
advertisement
मशीनला पाणी पुरवठा करणारा पाईपही चांगल्या अवस्थेत आहे की नाही हे अधूनमधून पाहणं आवश्यक आहे. ब्लँकेट, घोंगडी अशा जाडजूड आणि जड गोष्टी वॉशिंग मशीनमध्ये धुताना काळजी घ्या, अन्यथा मशीन बिघडेल. आपल्या वॉशिंग मशीनचा आवाज कसा येतो हे आपल्याला माहिती असतं. मात्र, नेहमीपेक्षा वेगळा आवाज येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. तसे आवाज आल्यास मशीनचा वापर थांबवा. नाही तर मशीनमधील बिघाड वाढू शकतो.
मायग्रेनची समस्या सुरू झाल्यावर काय करावं आणि काय करू नये? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
कपडे लावताना ते नीट एकसारखे लावले जात आहेत ना बघा. एका बाजूला जास्त कपडे, एका बाजूला कमी कपडे असा प्रकार टाळा. नाहीतर वॉशिंग मशीन खूप व्हायब्रेट होतं. त्यामुळे त्यात बिघाड होण्याचा धोका असतो. ओले कपडे बराच वेळ मशीनमध्येच पडून राहाणार नाहीत याची काळजी घ्या. पंप फिल्टरवर साचलेला मळ वेळच्यावेळी स्वच्छ करा. तसं न केल्यास त्रास होऊ शकतो. वापर आणि मेंटेनन्ससाठी कंपनीच्या गाईडलाईन्सचं पालन करा. आवश्यक तेव्हा सर्व्हिसिंग करुन घ्या.
वॉशिंग मशीन वापरताना या गोष्टींचं कटाक्षाने पालन केल्यास ते दीर्घकाळ आणि उत्तम चालेल. काळजीपूर्वक वापर आणि वेळच्यावेळी सर्व्हिसिंगमुळे तुमचं मशीन छान चालेल आणि अचानक बंद पडून तुमची गैरसोय करणार नाही.