या इंजेक्शनवर डाॅक्टरांनी प्रतिक्रिया काय?
काही डॉक्टर मात्र हे इतर औषधांइतके प्रभावी नसेल, असेही म्हणत आहेत. या सगळ्या गोंधळात, ज्या रुग्णांचे वजन अनेक प्रयत्न करूनही कमी होत नाहीये, ते या इंजेक्शनकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. आता लॅपरोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, मिनिमल ॲक्सेस सर्जरी, बॅरिएट्रिक सर्जरी, मेटाबॉलिक, जनरल सर्जरी आणि रोबोटिक सर्जरीसाठी प्रसिद्ध असलेल्या मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पतपडगंजचे महासंचालक डॉ. आशिष गौतम यांनीही यावर आपले मत मांडले आहे.
advertisement
इंजेक्शनचा प्रभाव असेपर्यंतच वजन कमी होईल, पण...
डॉ. आशिष गौतम यांच्या मते, वजन कमी करण्यासाठी बाजारात येणाऱ्या औषधांचा परिणाम शरीरावर तोपर्यंतच टिकतो, जोपर्यंत तुम्ही त्यांचा वापर करता. म्हणजेच, जोपर्यंत तुम्ही औषध घ्याल, तोपर्यंतच तुमचे वजन कमी होईल. ज्या दिवशी तुम्ही हे औषध घेणे बंद कराल, त्या दिवसापासून तुमचे वजन पुन्हा वाढू शकते किंवा वाढायला सुरुवात होऊ शकते, असे प्रकार यापूर्वी दिसून आले आहेत.
बॅरिएट्रिक सर्जरी हा एक चांगला पर्याय
अशा परिस्थितीत, लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण तात्पुरत्या नव्हे, तर दीर्घकालीन उपायांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. म्हणजेच, असा उपचार जो कायमस्वरूपी किंवा दीर्घकाळासाठी प्रभावी ठरेल. यासाठी आहारावर नियंत्रण आणि व्यायाम आवश्यक आहेच, पण याशिवाय बॅरिएट्रिक सर्जरी हा एक चांगला पर्याय आहे. अनेक चित्रपट कलाकारांनी आणि मोठ्या राजकारण्यांनीही ही शस्त्रक्रिया केली असून, आता ते पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. कारण ही शस्त्रक्रिया केवळ लठ्ठपणा कमी करत नाही, तर उच्च रक्तदाब (Hypertension), पीसीओडी (PCOD) आणि मधुमेह (Diabetes) यांसारख्या आजारांपासूनही संरक्षण देते. त्यामुळे हा एक चांगला पर्याय आहे.
या शस्त्रक्रियेचा खर्च आहे 2 ते 5 लाख
डॉ. आशिष गौतम यांनी सांगितले की, बॅरिएट्रिक सर्जरीमध्ये 2 ते 3 प्रकारच्या शस्त्रक्रिया वेगवेगळ्या स्तरांवर केल्या जातात, ज्याद्वारे लोकांचे वजन कमी होते. या शस्त्रक्रियेचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. मात्र, शस्त्रक्रिया असो वा कोणतेही औषध, ते महागडे असते. त्यामुळे येथे शस्त्रक्रियाच करावी, असे सांगितले जात नाहीये, पण एक सल्ला म्हणून, जर तुम्हाला कायमस्वरूपी उपचार हवा असेल, तर शस्त्रक्रिया हा एक योग्य आणि कायमस्वरूपी उपाय आहे. सध्या या शस्त्रक्रियेचा खर्च दोन लाख ते पाच लाखांपर्यंत येतो.
हे ही वाचा : दमट हवामानामुळे मीठ ओलसर होतंय? मग करा 'या' घरगुती उपाय; जास्त काळ टिकेल मीठ!
हे ही वाचा : पावसाळ्यात येताहेत त्वचेच्या समस्या? फाॅलो करा 'या' 5 टिप्स; पिंपल्स-रॅशेस होतील गायब, चेहऱ्यावर येईल ग्लो!