तुम्ही दिवसातून किती वेळा दूध गरम करता? एक... दोन... तीन... नाही... जितक्या वेळा ते वापराल तितक्या वेळा. बरोबर ना. दूध जितक्या वेळा गरम करू तितकं चांगलं असं जवळपास सगळ्यांना वाटतं. कारण काय तर दूध खराब होणार नाही. शिवाय फ्रिजमधलं दूध थंड मग ते कसं काय वापरणार, असा प्रश्न असतो. पण दूध वारंवार गरम करणं खरंच गरजेचं आहे, दूध वारंवार गरम केल्याने काय दुष्परिणाम होऊ शकतात याचा विचारच कधी कुणी केला नसेल. दूध गरम करण्याचाही धोका आहे. याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
advertisement
Health Risk Of The Day : सकाळी नाश्ता नाही केला तर काय होईल? ब्रेकफास्ट न करण्याचे दुष्परिणाम
डॉक्टरांनी सांगितल्यानुसार दूध वारंवार गरम करणं हे एडव्हान्स ग्लायसेशन इन प्रोडक्ट वाढवणारं आहे आणि हे ओबेसिटीजन आहे. यात दोन मुख्य मॉलक्युल असतात. एक सीएमएल म्हणजे कार्बोक्झिमिथेलाइसिन किंवा सीईएल कार्बोक्झिइशेलाइसिन. या प्रकारचे केमिकल्स तयार होतात.
हे केमिकल्स तुमच्या रक्तवाहिन्यांना कडक करतात. तुमच्या आरबीसीना कडक करतात आरबीसीची फ्लेक्झिबिलिटी किंवा फ्लुइसिटी जाते आणि मग ते छोट्या छोट्या रक्तवाहिन्यातून जात नाहीत आणि मग अटॅक येतो. किंवा मग लिव्हरची सूज वाढायला लागते. लिव्हरमधली चरबी वाढायला लागते.
Health Risk Of The Day : भाजलेल्या जागेवर बर्फ लावल्याने काय होतं?
याबाबत बरेच रिसर्च आहेत. पण असे रिसर्च फूड इंडस्ट्री वर येऊ देत नाहीत, अशी माहिती डॉ. मुकुंद सबनीस यांनी एका पॉडकास्टवर ही माहिती दिली आहे.