फक्त तिखटच नाही तर आरोग्यदायी आहे हिरवी मिरची
'दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं' ही म्हण हिरव्या मिरचीला पुरेपुर लागू ठरते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण ही मिरची फक्त जेवणाची चव वाढवते किंवा ती चवीला तिखट आहे इतकीच मिरचीची ओळख नाहीये. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही मात्र मिरचीत असलेल्या विविध औषधी गुणधर्मांमुळे मिरची ही अनेक आजारांना दूर सारू शकते. अनेक आजारांवर मिरचीचा वापर हा औषधाप्रमाणे केला जातो.
advertisement
हिरव्या मिरचीत असणारी पोषकतत्त्वे:
हिरव्या मिरचीत, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन के, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फोलेट, पोटॅशियम, थायामिन, लोह, तांबं इत्यादी खनिजे समाविष्ट आहेत. याशिवाय हिरव्या मिरचीत बीटा कॅरोटीन, अँटीऑक्सिडंट्स आणि एंडॉर्फिन देखील आढळून येतं. हिरव्या मिरचीत असलेलं कॅप्सॅसिन हे विविध आजारावर गुणकारी ठरू शकतं.
जाणून घेऊयात हिरवी मिरची खाण्याचे फायदे.
शरीर थंड राहतं : हिरवी मिरची ही चवीला तिखट असली तरीही ही आरोग्यासाठी फायद्याची आहे. तुमचा विश्वास बसणार नाही मात्र हिरवी मिरची खाल्ल्याने शरीर आतून थंडगार राहायला मदत होते.
डायबिटीस :
डायबिटीस असलेल्या रूग्णांनी हिरवी मिरची खाणं हे फायद्याचं मानलं जातं. दिवसातून एक मिरची नियमित खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. मिरचीत आढळणारं कॅप्सेसिन हे अँटीडायबेटिक म्हणून काम करतं. तुम्हाला जर मिरची फारच तिखट लागत असेल तर रात्री 2 हिरव्या मिरच्या कापून 1 ग्लास पाण्यात बुडवून ठेवा. सकाळी दात घासण्यापूर्वी हे पाणी प्यायल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
हे सुद्धा वाचा :मिरचीचा ठसका कोलेस्ट्रॉलवर भारी! हिरव्या मिरचीचे झणझणीत फायदे वाचून व्हाल थक्क
पचनक्रिया सुधारते :
हिरव्या मिरचीत चांगल्या प्रमाणात फायबर्स असतात. त्यामुळे अन्न पचायला मदत होते. हिरवी मिरची चावून खाल्ल्याने ती तिखट लागते. त्यामुळे तो तिखटपणा दूर करण्यासाठी तोंडात लाळेचं प्रमाण वाढतं. या लाळेत असलेल्या एन्झाईम्स अन्न पचायला मदत करतात.शिवाय हिरवी मिरचीत व्हिटॅमिन सी हे सुद्धा आढळून येतं. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारायला मदत होते.
हृदयासाठी आरोग्यासाठी फायदेशीर:
हिरवी मिरची हृदयासाठी खूप फायदेशीर मानली जाते. हिरवी मिरची खाल्ल्यामुळे रक्तातल्या खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊन चांगल्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. यामुळे रक्ताभिसण प्रकिया चांगली होते. याशिवाय रक्ताच्या गुठळ्या होण्यासही मिरची प्रतिबंध करते.
त्वचेच्या आरोग्यासाठी फायद्याची:
तुमचा विश्वास बसणार नाही मात्र हिरवी मिरची खाल्ल्याने त्वचेच्या आरोग्यात सुधारणा होते. मिरची खाल्ल्यामुळे त्वचा कोमल आणि तजेलदार होते.याशिवाय त्वचेवरच्या सुरकुत्या दूर होतात.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते:
ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने हिरवी मिरची खाल्ली त्यांना फायदा होऊ शकतो. हिरव्या मिरचीत असलेलं ‘व्हिटॅमिन सी’ आणि अँटिऑक्सिडेंट बीटा कॅरोटीन रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायद्याचे ठरतात.
