TRENDING:

ब्रेस्ट इम्प्लांट म्हणजे काय? ते करण्यासाठी नेमका किती खर्च येतो? अभिनेत्री शर्लिन चोपडामुळे चर्चेत आला विषय

Last Updated:

मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिन चोप्रा अलीकडे चर्चेत आली. तिने स्वतःचे ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकल्याची माहिती इंस्टाग्रामवरील एका व्हिडिओद्वारे दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजकाल लोक सुंदर दिसण्यासाठी सर्जरी करु लागले आहेत. रंग गोरा करणं, ओठ मोठे करणं, नाक सरळ किंवा शार्प करण, सारख्या वेगवेगळ्या गोष्टी कॉस्मॅटिक्समध्ये येतात. पण ही सर्जरी एवढ्यावरच न रहाता आता ती परफेक्ट बॉडी आणि आकर्षक दिसण्याच्या शर्यतीत उतरली आहे. अनेक महिला स्वतःकडे अधिक सुंदर दिसण्याच्या नजरेने पाहू लागतात. या प्रवाहात ब्रेस्ट एनहांसमेंट ही एक ओळखीची प्रक्रिया बनली आहे. पण गेल्या काही वर्षांत एक वेगळाच बदल दिसत आहे.
शर्लिन चोप्रा
शर्लिन चोप्रा
advertisement

मोठ्या साइजच्या, जड इम्प्लांटऐवजी हलके, नैसर्गिक दिसणारे आणि शरीराशी जुळणारे पर्याय अधिक लोकप्रिय होत आहेत. अगदी काही महिला तर आधी बसवलेले इम्प्लांट काढून टाकण्याचाच निर्णय घेत आहेत. याच संदर्भात मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिन चोप्रा अलीकडे चर्चेत आली. तिने स्वतःचे ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकल्याची माहिती इंस्टाग्रामवरील एका व्हिडिओद्वारे दिली.

तिच्या म्हणण्यानुसार, हा निर्णय घेतल्यावर तिच्या छातीवरील ओझं अक्षरशः हलकं झालं आहे. ती तरुण पिढीला अनावश्यक ओझं न वाहण्याचा सल्ला देते. कारण सौंदर्याचा खरा अर्थ आरामात आणि आत्मविश्वासात आहे, जबरदस्तीच्या बदलांमध्ये नाही.

advertisement

ब्रेस्ट इम्प्लांटची प्रक्रिया साधारण अशी असते की मेडिकल ग्रेड सिलिकॉनपासून तयार केलेले इम्प्लांट सर्जरीद्वारे ब्रेस्टमध्ये बसवले जातात. नवी दिल्लीतल्या सर गंगाराम सिटी हॉस्पिटलचे प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन डॉ. रमन शर्मा सांगतात की ज्या महिलांचा ब्रेस्ट साइज जन्मतः लहान असतो, त्यांच्यासाठी ही प्रक्रिया अधिक उपयुक्त मानली जाते. पूर्वी मोठ्या इम्प्लांटकडे झुकणारी आवड होती, पण आज महिलांचा कल पूर्णपणे बदलला आहे. आता दिसण्यात नैसर्गिकता, शरीराच्या रचनेशी जुळणारा आकार आणि कम्फर्ट याला प्राधान्य दिलं जातं.

advertisement

काही वेळा ब्रेस्ट इम्प्लांट फक्त इच्छेमुळेच नाही तर गरजेपोटीही काढावे लागतात. काही महिलांना कालांतराने इम्प्लांटमध्ये हार्डनेस जाणवतो, वेदना होतात किंवा दुर्मीळ प्रसंगी इम्प्लांट फाटण्याची शक्यता निर्माण होते. अशा वेळी इम्प्लांट काढून टाकणे हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. डॉक्टर सांगतात की इम्प्लांट साधारणपणे सुरक्षित आणि टिकाऊ असतात, त्यामुळे कोणतीही अडचण नसेल तर त्यांना तसेच ठेवणेही योग्य असते.

advertisement

या प्रक्रियेचा खर्च साधारण दीड लाख रुपयांच्या आसपास असतो, ज्यामध्ये इम्प्लांटपासून ते सर्जरीपर्यंत सर्वकाही समाविष्ट असतं. इम्प्लांट काढण्याची सर्जरी तुलनेने सोपी आणि कमी खर्चाची असते. सुमारे साठ ते सत्तर हजारांमध्ये ती पूर्ण होते. दोन्ही सर्जरी साधारण एक तासात पूर्ण केल्या जातात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात झपाट्याने बदल, मका आणि कांद्याची काय स्थिती? इथं चेक करा
सर्व पहा

याचबरोबर, आज ‘हायब्रिड इम्प्लांट’चीही मागणी वाढताना दिसते. या पद्धतीमध्ये छोट्या साइजच्या इम्प्लांटसोबत शरीरातील फॅटही ब्रेस्टमध्ये भरलं जातं, ज्यामुळे साइज आणि आकार अधिक नैसर्गिक दिसतो. या प्रक्रियेला साधारण दोन तास लागतात आणि शरीरातील फॅट वेगळं काढून ते तयार करून ब्रेस्टमध्ये भरण्याची तंत्रशुद्ध पद्धत वापरली जाते. डॉक्टरांच्या मते, अनेक महिलांसाठी हा पर्याय अधिक सुरक्षित, नैसर्गिक आणि दीर्घकाळ टिकणारा ठरतो.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
ब्रेस्ट इम्प्लांट म्हणजे काय? ते करण्यासाठी नेमका किती खर्च येतो? अभिनेत्री शर्लिन चोपडामुळे चर्चेत आला विषय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल