वीकेंड मॅरेज म्हणजे पती-पत्नी एकत्र राहत नाहीत तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शनिवार-रविवार किंवा काही ठराविक दिवशी एकमेकांना भेटतात आणि एकत्र राहतात. व्हिडिओ कॉल, चॅट आणि सोशल मीडियामुळे अंतराची भावना कमी होते.
advertisement
वीकेंड मॅरेज म्हणजे लग्न करणं पण वेगळं राहणं. पती-पत्नी दोघंही कामामुळे वेगवेगळ्या शहरात किंवा घरात राहतात. आठवड्याच्या शेवटी किंवा सुट्टीच्या दिवशी एकत्र वेळ घालवतात, नंतर पुन्हा कामावर जातात. यामुळे त्यांच्यातील भावनिक नातं अबाधित राहते, पण दैनंदिन जबाबदाऱ्या वेगळ्या असतात.
वीकेंड मॅरेज करण्याची मुख्य कारणं दोन्ही पार्टनर वेगवेगळ्या शहरात काम करतात. लग्नानंतरही स्वतःचे स्वातंत्र्य आणि पर्सनल स्पेस असण्याची इच्छा. एक पार्टनर शिकत असेल, स्वतःचं आयुष्य जपणं. दररोज एकत्र राहण्यामुळे येणारे वाद, संघर्ष किंवा ताणतणाव टाळणं. मानसिक शांती आणि स्वतःसाठी वेळ.
आजचे तरुण त्यांच्या करिअरला प्राधान्य देत नात्यांमध्ये संतुलन साधू इच्छितात. त्यांना लग्न करायचे आहे पण त्यांना रोजच्या ताणतणावापासून किंवा एकाकीपणापासून दूर राहायचं आहे. थोडक्यात पारंपारिक लग्नाच्या अपेक्षांपासून दूर, लवचिकता, स्वातंत्र्य आणि समजूतदारपणावर आधारित आधुनिक जोडप्यांमध्ये वीकेंड मॅरेज एक आदर्श बनत आहे.