होम सायन्स एक्सपर्ट आकाश यांचा सल्ला
लोकल 18 शी बोलताना होम सायन्सचे अभ्यासक आकाश यांनी सांगितलं की, जर फ्रिजचा योग्य वापर केला तर ही समस्या टाळता येऊ शकते. त्यांनी काही खूप सोप्या आणि प्रभावी टिप्स शेअर केल्या आहेत, ज्यांचा वापर करून फ्रिजमध्ये जाड बर्फ तयार होण्याची समस्या कायमची दूर करता येईल.
advertisement
बर्फ तयार होऊ नये म्हणून करा हे 6 प्रभावी उपाय
- फ्रिजचा दरवाजा वारंवार उघडू नका : वारंवार दरवाजा उघडल्याने गरम हवा आत जाते, ज्यामुळे आद्रता गोठते आणि बर्फ तयार होतो.
- सीलिंग तपासा : जर गॅस्केट (रबर सील) खराब असेल तर थंड हवा बाहेर जाते आणि आद्रता आत येते. ती स्वच्छ ठेवा किंवा बदला.
- गरम वस्तू ठेवू नका : ज्या वस्तूंमधून वाफ बाहेर पडते त्या थंड करून आणि झाकून ठेवा, जेणेकरून आद्रता पसरणार नाही.
- फ्रिज ओव्हरलोड करू नका : गरजेपेक्षा जास्त वस्तू ठेवल्याने हवा खेळती राहत नाही आणि फ्रिजवर जास्त भार येतो.
- डीफ्रॉस्ट मोड वापरा : आठवड्यातून एकदा मॅन्युअल डीफ्रॉस्ट नक्की करा.
- थर्मोस्टॅट योग्य तापमानावर ठेवा : 3 ते 5 अंश सेल्सियस तापमान योग्य आहे. खूप कमी तापमान ठेवल्यास जास्त बर्फ तयार होतो.
बर्फ तयार होणार नाही, त्रास वाढणार नाही!
या उपायांचा अवलंब केल्याने तुम्हाला केवळ बर्फाच्या जाड थरापासून मुक्ती मिळणार नाही, तर फ्रिजची वीज बचत होईल, साफसफाईचा वेळ वाचेल आणि तुमच्या मशीनचं आयुष्यही वाढेल.
हे ही वाचा : घरात सुख-समृद्धी हवी आहे? तर झाडू ठेवताना करू नका या चुका; अन्यथा तिजोरी होईल रिकामी
हे ही वाचा : आता महागडी क्लीनिंग प्रोडक्ट विसरा, फक्त 1 बटाटा वापरा, घर होईल एकदम फर्स्ट क्लास!