आरओ वॉटर प्यूरिफायरमधून निघणाऱ्या पाण्याचं काय करायचं हा प्रश्न अनेकांना पडला आहे. हे पाणी दुषित असले तरी आपण अन्य कामासाठी याचा वापर करू शकतो. या पाण्याचा पुनर्वापर कसा करावा जाणून घ्या.
मोठ्या पडद्यावर येण्यासाठी बनला 'गे', तरी लाखो तरुणींच्या मनावर करतोय राज्य, एका झलकेसाठी चाहते उतावळे
बाग सिंचन करण्यासाठी उपयुक्त
advertisement
या पाण्याचा वापर बाग सिंचन करण्यासाठी करता येऊ शकतो. या पाण्यामध्ये मिनरल्स आणि क्षारांचे प्रमाण अधिक असते. यामुळे त्यांचा वापर थेट झाडांवर करू नये. तर सामान्य पाण्यामध्ये हे पाणी मिसळून याचा वापर करावा. जेणे करून झाडांचे नुकसान होणार नाही. ज्या झाडांमध्ये क्षार शोषून घेण्याची क्षमता अधिक असते, त्या झाडांवर या पाण्याचा वापर करता येऊ शकतो.
फरशी पुसण्यासाठी करता येईल वापर
आरओ वॉटर प्यूरिफायरमधून निघणाऱ्या पाण्याचा वापर फरशी पुसण्यासाठी करता येऊ शकतो. पाण्यामधील मिनरल्स आणि क्षारांमुळे फरशीवर कोणताही परिणाम होत नाही. यामुळे पाण्याची बचतही करता येईल.
Covid 19 ची भीती कायमस्वरुपी नष्ट होणार? अखेर शास्त्रज्ञांनी शोधून काढला प्रभावी उपाय
वाहने धुण्यासाठी उपयुक्त
कार, बाईक्स यांसारखी वाहने धुण्यासाठी भरपूर पाणी वाया जाते. अशा परिस्थितीत आरओ वॉटर प्यूरिफायरमधून निघालेले पाणी कामी येऊ शकते. जर पाण्यामध्ये मिनरल्सचे प्रमाण जास्त असल्यास वाहन धुवून झाल्यावर ते पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे.
टॉयलेट फ्लश
आरओ वॉटर प्यूरिफायरमधून निघणाऱ्या पाण्याचा वापर टॉयलेट फ्लशमध्ये करता येऊ शकतो. टॉयलेट फ्लशसाठी भरपूर पाणी वाया जाते. अशा परिस्थितीत हे पाणी कामी येऊ शकते आणि स्वच्छ पाण्याची बचतही करता येईल.