जाणून घेऊयात रात्री कोणते पदार्थ खाण्याचं टाळणं हे आरोग्यासाठी जास्त फायद्याचं आहे.
थंड पदार्थ खाऊ नका :
रात्री झोपण्यापूर्वी थंड पदार्थ खाणं टाळावं. थंड पदार्थ म्हणजे फक्त फ्रिजमधले थंड पदार्थ नाहीत तर जे पदार्थ थंड प्रवृत्तीचे असतात असे सगळ्या प्रकारचे पदार्थ आणि फळं रात्री खाणं टाळायला हवं. दही, भात, टरबूज, उसाचा रस, अननस आणि असे अनेक पदार्थ जे थंड प्रवृत्तीचे असतात जे रात्रीच्या वेळी खाल्ल्याने कफ आणि खोकल्याचा त्रास होऊ शकतो. तथापि, ज्यांना आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्या नाहीत ते गरम भात खाऊ शकतात.
advertisement
तेलकट आणि मसालेदार पदार्थ :
रात्रीच्या वेळी जास्त तेलकट आणि जास्त मसालेदार अन्नपदार्थ न खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. यामुळे अपचनासह, गॅसेस आणि ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. याशिवाय, जेव्हा जास्त तेलकट आणि मसालेदार अन्न खाल्ल्यानंतर लगेच झोपाल्यानंतर लठ्ठपणाचा धोकाही अनेक पटींनी वाढतो. ज्यामुळे कॉलेस्ट्रॉल, हाय ब्लडप्रेशर किंवा डायबिटीससारखे आजार होण्याचा धोका वाढतो.
स्टार्च, कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ रात्री नकोच :
रात्रीच्या वेळी स्टार्च किंवा कार्बोहायड्रेट्स जास्त असलेले पदार्थ खाणं टाळावं. रात्रीच्या वेळी असे पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. ज्यामुळे वजन वेगाने वाढू शकते. याशिवाय स्टार्च आणि कार्बोहायड्रेट्सयुक्त अन्न पचवताना पचनाच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. ज्याचा विपरित परिणाम तुमच्या झोपेवर आणि एकूणच आरोग्यावर होऊ शकतो.
पाणीदार पदार्थ, रसाळ फळं खाऊ नका :
रात्री जास्त पाणी असलेले पदार्थ खाणं टाळावं. जरी या गोष्टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्या तरी रात्री त्या खाल्ल्याने जास्त नुकसान होतं. टरबूज, नारळ पाणी, लिंबूपाणी, दही, लस्सी असे काही पदार्थ आहेत जे रात्रीच्या वेळी खाल्ल्याने गॅस, पोटफुगी, सतत लघवीचा त्रास आणि प्रोस्टेट ग्रंथीशी संबंधित आजार उद्भवू शकतात.
रात्री पचनास जड पदार्थ नको :
तज्ज्ञांच्या मते, रात्री नेहमी हलका आणि सहज पचणारा आहार घ्यावा. काही डाळी आणि धान्यं अशी असतात जी पचायला बराच वेळ लागतात. असं म्हटलं जातं की, ज्या गोष्टी वाढण्यासाठी जास्त वेळ लागतो त्या गोष्टी पचायलाही वेळ लागतो. त्यामुळे रात्री मासांहार, काही ठराविक भाज्या आणि डाळींचं सेवन केल्याने आरोग्याला नुकसान पोहोचू शकतं. ज्याचा वाईट परिणाम तुमच्या पचनावर आणि एकूणच आरोग्यावर होऊ शकतो.