धूळ मातीपासून केसांचे संरक्षण व्हावे यासाठी काहीजण केसांची वेणी घालतात तर कोणी आंबाडा घालतात. तर काहीजण केस मोकळे ठेवून त्याची विविध हेअर स्टाईल करतात. मात्र झोपताना केस मोकळी ठेवावीत की वेणी घालून बांधून ठेवावीत असा प्रश्न अनेकांना पडतो.
तज्ज्ञांच्या मते, जेव्हा व्यक्ती केस मोकळे ठेऊन झोपतात आणि त्यांची केस ही लांबसडक असतील तर त्यात गुंता होण्याची शक्यता असते. सकाळी केसांमधील हा गुंता सोडवताना केस तुटू शकतात, ज्यामुळे केसांचे नुकसान होते. तेव्हा शक्यतो केसांची सैल वेणी घालून झोपावे असा सल्ला तज्ज्ञ देतात.
advertisement
Salt : ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी कोणत्या मिठाचे सेवन करावे? High BP राहील नियंत्रणात
केस बांधून झोपण्याचे फायदे आणि नुकसान : केस बांधून झोपल्याने सकाळी केसांचा गुंता होत नाही. त्यामुळे केस नीट विचारता येतात आणि तुटत नाहीत. तेव्हा केस बांधून झोपणे हा एक उत्तम पर्याय आहे. केस बांधताना ते अतिशय टाईट रबरने बांधू नये. केसांना टाईट रबर बांधल्यामुळे केस ओढली जातात आणि मुळापासून तुटण्याची शक्यता असते.
केस मोकळे ठेऊन झोपण्याचे फायदे आणि नुकसान : केस मोकळे ठेऊन झोपल्याने केसांवर ताण येत नाही ज्यामुळे केस गळत नाही. तर केस मोकळे ठेवल्याने त्यात गुंतागुंत होऊ शकते ज्यामुळे केस तुटतात.
