TRENDING:

बाबा वेंगा नाही, WHO ची भयानक भविष्यवाणी ठरतेय खरी! भारतासह 17 देश संकटात

Last Updated:

Chikungunya Outbreak : 73 वर्षे जुना आणि सुमारे 20 वर्षांपूर्वी जगभरात कहर करणारा एक व्हायरस एकदा परतला आहे. WHO ने म्हटलं होतं की 119 देशांमधील सुमारे 560 कोटी लोकांना या व्हायरसच्या संसर्गाचा धोका आहे. सध्या आशिया आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये त्याचे रुग्ण सतत वाढत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : बाबा वेंगा असो, रिओ तात्सुकी असो, वा नास्त्रेदामस आजवर यांच्या भविष्यवाण्यांबाबत तुम्ही बरंच ऐकलं असेल. काही घटना घडल्या की त्याचा संबंध यांच्या भविष्यवाणीशी जोडला जातो. त्यांच्या भविष्यावाणी खऱ्या ठरत असल्याची भीती वाटू लागते. पण आता कुणा बाबाची नाही तर जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्लूएचओची भविष्यवाणी खरी ठरताना दिसत आहे. त्यामुळे जगभर एकच खळबळ उडाली आहे.
News18
News18
advertisement

73 वर्षे जुना आणि सुमारे 20 वर्षांपूर्वी जगभरात कहर करणारा एक व्हायरस एकदा परतला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गेल्या महिन्यात इशारा दिला होता की हा व्हायरस आशियाई देशांपासून ते युरोपपर्यंत कहर करू शकतो.  WHO ने म्हटलं होतं की 119 देशांमधील सुमारे 560 कोटी लोकांना या व्हायरसच्या संसर्गाचा धोका आहे. सध्या आशिया आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये त्याचे रुग्ण सतत वाढत आहेत.

advertisement

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या वर्षी आतापर्यंत मध्य आणि दक्षिण अमेरिका, आफ्रिका, हिंद महासागर प्रदेश आणि आशियातील अनेक भागात या व्हायरसचे सुमारे 2.4 लाख रुग्ण आढळले आहेत. ज्यामध्ये 90 जणांचा मृत्यूही झाला आहे.

भारतासह 17 देशांमध्ये अलर्ट

हे लक्षात घेता सीडीसीने लेव्हल-2 प्रवास आरोग्य सूचना जारी केली आहे. ज्यामध्ये अधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. यामध्ये दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया, चीनचा ग्वांगडोंग प्रांत, मादागास्कर, मॉरिशस, मेयोट, रियुनियन, सोमालिया आणि हिंद महासागर क्षेत्रातील श्रीलंका यासारख्या देशांचा समावेश आहे. याशिवाय, सीडीसीने ब्राझील, कोलंबिया, भारत, मेक्सिको, नायजेरिया, पाकिस्तान, फिलीपिन्स आणि थायलंड यांच्या संदर्भात अमेरिकन प्रवाशांसाठी इशारा देखील जारी केला आहे.

advertisement

उत्तराखंडमध्ये निसर्गाचं तांडव, महाराष्ट्रातील 10 भाविक अडकले, बचावकार्य सुरू

आता हा व्हायरस कोणता? तर तो आहे चिकनगुनिया. गेल्या काही महिन्यांत चिकनगुनिया विषाणू ला रियुनियन, मेयोट आणि मॉरिशस सारख्या बेटांवरून मादागास्कर, सोमालिया आणि केनिया सारख्या आफ्रिकन देशांमध्ये पसरला आहे. आता तो चीनमध्ये वेगाने पसरत आहे. चीनच्या ग्वांगडोंग प्रांतात डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया विषाणूचे 7000 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. या विषाणूला साथीचे स्वरूप येऊ नये म्हणून, चीनमध्ये मोठे महाकाय डास सोडले जात आहेत, जे चिकनगुनिया पसरवणाऱ्या लहान डासांना नष्ट करू शकतात. सरकारने चिनी प्रांतातील सर्व लोकांना त्यांच्या घरात साचलेले पाणी काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. असं न केल्यास 1 लाख रुपयांपेक्षा जास्त दंड आकारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

advertisement

जगभरात चिकनगुनियाबद्दल भीती का?

WHO च्या मते, एक काळ असा होता जेव्हा चिकनगुनिया विषाणू उष्णकटिबंधीय देशांमध्ये पसरत असे. तेव्हा युरोपमध्ये त्याचा धोका खूप कमी होता, परंतु आता युरोपमध्येही चिकनगुनिया विषाणूचे रुग्ण आढळत आहेत, ज्यामुळे तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. हवामान बदल आणि जागतिक पर्यटनामुळे हा विषाणू आता युरोपमध्येही पसरत आहे. 1 मे पासून फ्रान्समध्ये चिकनगुनियाचे सुमारे 800 रुग्ण आढळले आहेत, ज्यात 12 स्थानिक संसर्गांचा समावेश आहे. काही प्रकरणांमध्ये, डासांमुळे प्रवास न करता लोक संसर्गित होत आहेत. अलीकडेच इटलीमध्येही एक रुग्ण आढळला आहे. यावरून हे स्पष्ट होते की आता तो आशियाई देशांमधून युरोपमध्ये पसरत आहे, ज्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे. भारताबद्दल बोलायचx झाले तर, दरवर्षी देशात चिकनगुनियाचे रुग्ण आढळतात, परंतु परिस्थिती नियंत्रणात राहते. तथापि, ते टाळणं खूप महक्त्वाचं आहे.

advertisement

चिकनगुनिया म्हणजे काय आणि तो कसा पसरतो?

नवी दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयाच्या प्रतिबंधात्मक आरोग्य आणि कल्याण विभागाच्या संचालिका डॉ. सोनिया रावत यांनी न्यूज18 ला सांगितलं की, चिकनगुनिया हा एक विषाणूजन्य ताप आहे जो डासांद्वारे पसरतो. हा एडिस एजिप्टी आणि एडिस अल्बोपिक्टस डासांमुळे पसरतो. हे डास दिवसा जास्त सक्रिय असतात. चिकनगुनिया विषाणूची पहिली ओळख 1952 मध्ये टान्झानियामध्ये झाली.

Earth: 2025 मध्ये पृथ्वीवर भयानक संकट, मानवाचा अंत? स्टीफन हॉकिंगची भविष्यवाणी, नवा रिपोर्ट समोर

जेव्हा डास चिकनगुनिया विषाणूने संक्रमित व्यक्तीला चावतो तेव्हा तो डास देखील संक्रमित होतो. यानंतर, जेव्हा तोच डास निरोगी व्यक्तीला चावतो तेव्हा विषाणू त्याच्या शरीरात प्रवेश करतो. तो थेट संपर्काद्वारे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरत नाही, परंतु त्याच भागात एकाच वेळी अनेक लोकांना आजारी करू शकतो. पावसाळ्यात त्याचा प्रादुर्भाव विशेषतः वाढतो, जेव्हा डासांची वाढ जास्त होते.

चिकनगुनियाची लक्षणं आणि उपचार

डॉक्टरांच्या मते, विषाणूजन्य डास चावल्यानंतर 4 ते 8 दिवसांनी चिकनगुनियाची लक्षणं दिसून येतात. या विषाणूची लागण झाल्यावर लोकांना तीव्र ताप, हात, पाय, गुडघे आणि मनगटांमध्ये असह्य वेदना, डोकेदुखी, स्नायू दुखणं, थकवा आणि पुरळ येणं अशी लक्षणं दिसतात. काही प्रकरणांमध्ये, डोळ्यांत जळजळ होणं आणि उलट्या होणं यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. सांधेदुखी कधीकधी आठवडे किंवा महिने टिकू शकते, ज्यामुळे रुग्णाला चालण्यास त्रास होतो.

उपचारांबद्दल बोलायचं झालं तर, चिकनगुनियासाठी कोणताही विशिष्ट अँटीव्हायरल उपचार नाही. त्याच्या लक्षणांवर आधारित उपचार केले जातात. तापासाठी पॅरासिटामॉल आणि वेदनांसाठी वेदनाशामक औषधं दिली जातात. अशा रुग्णांना जास्तीत जास्त विश्रांती घेण्याचा आणि पुरेसं पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. सांधेदुखीसाठी हलकी शारीरिक उपचार देखील फायदेशीर ठरू शकतात. सध्या चिकनगुनिया विषाणूसाठी कोणतीही लस उपलब्ध नाही, परंतु अनेक देशांमध्ये संशोधन आणि चाचण्या सुरू आहेत. काही लसी क्लिनिकल ट्रायल टप्प्यात आहेत आणि भविष्यात उपलब्ध होऊ शकतात.

चिकनगुनिया कसा रोखता येईल?

लस येईपर्यंत, प्रतिबंध हा सर्वोत्तम उपाय आहे. डासांपासून दूर राहणं, स्वच्छता राखणं आणि वेळेवर लक्षणं ओळखणं आणि उपचार सुरू करणं हे या आजारापासून बचाव करण्याचे सर्वात प्रभावी मार्ग आहेत. तज्ज्ञांच्या मते, चिकनगुनिया टाळण्यासाठी डासांपासून संरक्षण करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. डासांच्या चावण्यापासून बचाव करण्यासाठी, पूर्ण बाह्यांचे कपडे घाला, मच्छरदाण्या वापरा आणि घराभोवती पाणी साचू देऊ नका. पाण्याचे भांडे झाकून ठेवा आणि डास प्रतिबंधक क्रीम किंवा स्प्रे वापरा. खिडक्या आणि दारांवर जाळ्या लावा जेणेकरून डास घरात प्रवेश करू नयेत. पावसाळ्यात विशेष खबरदारी घ्या, कारण या ऋतूमध्ये त्याचा प्रादुर्भाव सर्वाधिक असतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
बाबा वेंगा नाही, WHO ची भयानक भविष्यवाणी ठरतेय खरी! भारतासह 17 देश संकटात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल