मुंबईतील कुर्ला परिसरात लक्ष्मी अगरबत्ती भंडार इथे तुम्हाला देवपूजेसाठी लागणारं सगळं साहित्य होलसेल दरात मिळेल. या दुकानात मिळणाऱ्या खास वस्तूंमध्ये प्रीमियम क्वालिटीच्या धूपस्टिकचा समावेश आहे, ज्या केवळ 40 रुपयांपासून सुरू होतात. दिव्यासाठी आवश्यक तेल लहान आणि मोठ्या बाटल्यांमध्ये 40 ते 100 रुपये दरम्यान मिळतं. याशिवाय कापूरदाणी 80 रुपयांना उपलब्ध आहे, ज्याचा वापर तुम्ही कापूर जाळण्यासाठी करू शकता. कापसाची वात 30 रुपये डझन आणि कापूस 80 रुपये डझन आहे. तर दिव्यात टाकण्यासाठी शुद्ध तूप फक्त 200 रुपयांत मिळते.
advertisement
टेक्नॉलॉजीची कमाल, बेडशीटवर झोपलं की मिळणार व्हिटॅमिन, छ. संभाजीनगरमध्ये रिमोटवरचे पडदे
अगरबत्त्यांच्या विविध प्रकारांतून तुम्हाला 30 रुपयांपासून ते 80 रुपयांपर्यंत प्रीमियम क्वालिटीच्या अगरबत्त्या निवडता येतील. अगरबत्ती किलोच्या हिशोबाने देखील मिळते आणि तिची किंमत 300 ते 400 दरम्यान आहे. तसंच घरासाठी आवश्यक रूम फ्रेशनर 70 रुपयांपासून आहे. गुलाब पाणी आणि गंगाजल 20 रुपये, मच्छर अगरबत्ती 80 रुपये डझन, आणि पितांबर 15 रुपये या किफायतशीर दरात मिळते. दुकानात प्रसिद्ध ब्रँड्सची उत्पादनेही आहेत. सायकल ब्रँडची अगरबत्ती 90 रूपयांना 250 ग्रॅम पॅकमध्ये मिळते. तसेच, भीमसेन कापूर सुद्धा येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे.
दरम्यान, मुंबईतील या होलसेल दुकानात एकाच ठिकाणी सर्व पूजासामग्री मिळते. त्यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि दर परवडणारे असल्यामुळे खर्चही कमी होतो.