टेक्नॉलॉजीची कमाल, बेडशीटवर झोपलं की मिळणार व्हिटॅमिन, छ. संभाजीनगरमध्ये रिमोटवरचे पडदे
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
Technology: सुगंधी बेडशीट आणि रिमोट कंट्रोलवर चालणारे पडदे छत्रपती संभाजीनगरमध्ये मिळत आहेत. 300 रुपयांपासून 7 हजार रुपयांपर्यंत यांच्या किमती आहेत.
छत्रपती संभाजीनगर : घर म्हणजे फक्त चार भिंती नव्हे तर तंत्रज्ञान आणि स्टाईलचा संगमही बनले आहे. आधुनिक युगात गृह सजावटही स्मार्ट झाली आहे. पूर्वी पट्टी असलेले पडदे घराची शोभा वाढवत होते. परंतु, तंत्रज्ञानात बदल झाल्याने रिमोट सेन्सरवर घराचे पडदे, अंथरुणावर पडल्यानंतर आपल्याला व्हिटॅमिनची पूर्तता करणारी बेडशीट आलीये. नव्या युगात नव्या तंत्रज्ञानानुसार ग्राहकांची मागणीही वाढत चालली आहे. या पडद्याच्या किमती 300 रुपयांपासून 7 हजार रुपयांपर्यंत आहेत, असे छत्रपती संभाजीनगर येथील जवाहर कॉलनीतील फर्निशिंग विक्रेते विशाल मालवंदकर यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
व्हिटॅमिन देणारे बेडशीट
आपल्या शरीरात व्हिटॅमिनची कमतरता असेल तर चिंता नाही. सहज बेडशीटवर झोपा आणि त्यातून व्हिटॅमिन मिळेल. हे ऐकून नवलच वाटले ना? हो. हे खरे आहे. आज व्हिटॅमिन ई, बी युक्त बांबूपासून तयार केलेले बेडशीटही उपलब्ध आहेत. बेडशीटवर झोपल्यानंतर सहजरित्या व्हिटॅमिन मिळते. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी चमकणारे रेडियमचे बेटशीट, झोपल्यानंतर विविध सुवास येतील असे सेंटेड बेडशीट ग्राहकांची पसंतीला उतरत आहे. बेडशीटच्या किमती 300 रुपयांपासून 5 ते 7 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
advertisement
पडद्यांची क्रेझ
पूर्वी प्लेन आणि विविध चित्रे असलेले पडदे वापरले जात होते. आता मंदिराच्या खिडक्यांसाठीही पडदे उपलब्ध आहेत. एवढेच नाहीतर सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर खिडक्या, दरवाजांचे पडदे विक्रीसाठी उपलब्ध असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ग्राहक पडदे विकत घेत आहेत. कस्टमाइज्ड पडद्यांची क्रेझ वाढत चालली आहे. त्यामध्ये आकर्षक डिझाइन आणि सहजरित्या उघडतील, बंद होतील आणि विविध रंगाच्या पडद्यांना मागणी आहे.
advertisement
रिमोट सेंसरवरचे पडदे
आता बाजारात रिमोट कंट्रोलवर चालणारे पडते आले आहेत. ते घर, ऑफिस, कंपन्यामध्ये वापरले जातात. त्यासोबत सिलिंगला लावण्यासाठीही पडदे आहेत. पूर्वी प्लेन, फ्लॉवर्सच्या जागी वेस्टर्न स्टाइल दिसतील, असे पडदे आले आहेत. ऑफिससाठी ब्लाइंड, वूडन, झेब्रा पडदे अशा विविध प्रकारचे पडदे उपलब्ध असल्याचंही विक्रेते सांगतात.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
May 25, 2025 4:31 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
टेक्नॉलॉजीची कमाल, बेडशीटवर झोपलं की मिळणार व्हिटॅमिन, छ. संभाजीनगरमध्ये रिमोटवरचे पडदे