Business Success: दोघा मित्रांनी ठरवलं, सुरू केला खास बिझनेस, आता 35 कामगार अन् कमाई 45 लाख!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Aishwarya Ramnath Taskar
Last Updated:
Business Success: अहिल्यानंगरमधील दोघा मित्रांनी जिद्द आणि चिकाटीच्या बळावर उद्योग विश्वात आपली ओळख निर्माण केलीये. त्यांची वर्षाची कमाई 45 लाखांच्या घरात आहे.
अहिल्यानगर: एखादा मोठा बिझनेसमन होण्याचं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. परंतु, व्यवसाय उभारायचा म्हटलं की, भांडवल देखील तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे अनेक तरुणांनाकडे बिझनेस आयडिया असताना देखील त्यांचं स्वप्न साकार होऊ शकत नाही. मात्र, काहीजण यातूनही मार्ग काढत जिद्द आणि चिकाटीच्या बळावर उद्योगात यशस्वी होतात. अहिल्यानगरमधील शिर्डीचे विजय चव्हाण आणि योगेश काटकर यांनी उद्योग विश्वात स्वत:चं नाव केलंय. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
विजय चव्हाण आणि योगेश काटकर यांनी 2008 मध्ये लॉन्ड्री व्यवसायाला सुरुवात केली. हळूहळू व्यवसाय वाढत गेला. पण या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. डिलिव्हरी करायला गाडी नव्हती. तरीही बाईकवर डिलिव्हरी करून व्यवसायात सातत्य ठेवलं. 2010 मध्ये एका घरातून शिर्डी गावात लॉन्ड्री व्यवसाय चालू केला. आता शिर्डीतील 90 टक्के हॉटेलची लॉन्ड्री तसेच ड्रायक्लीनची कामे त्यांच्याकडे आहेत.
advertisement
लॉकडाऊनमध्ये अडचणी
कोरोना लॉकडाऊनमध्ये व्यवसाय बंद करावा की काय असा प्रश्न आला. पण व्यवसाय बंद न करता त्यात 2020 मध्ये वाढ करत शताब्दी ड्रायक्लीनची नव्याने सुरुवात केली. आता नाशिकमध्ये देखील त्यांची अजून एक शाखा सुरू झालीये. त्यामुळे शिर्डीत 2 तर नाशिकमध्ये एक अशा ठिकाणी लॉन्ड्री व्यवसाय सुरू आहे.
advertisement
सध्या 30 ते 35 स्टाफ
चव्हाण आणि काटकर यांनी लॉन्ड्री व्यवसायातून 30 ते 35 कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून जवळपास 40 ते 50 लाखापर्यंत कमाई करतोय. कमी भांडवल गुंतवून व्यवसायाला सुरुवात केली आणि त्यात जर सातत्य ठेवलं तर एक दिवस नक्कीच यश भेटतं, असं ते सांगतात.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
May 25, 2025 4:02 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Business Success: दोघा मित्रांनी ठरवलं, सुरू केला खास बिझनेस, आता 35 कामगार अन् कमाई 45 लाख!