भन्नाट उपाय, कीटकांपासून होते सुटका
हे कीटक माणसांसाठी खूप त्रासदायक असतात, विशेषतः उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात. कीटकनाशकांसारख्या पारंपरिक पद्धतींचा वापर कधीकधी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. म्हणूनच लोकांनी आता असे घरगुती आणि नैसर्गिक उपाय स्वीकारायला सुरुवात केली आहे, ज्यामुळे कोणतेही नुकसान न होता कीटकांपासून सुटका होते.
डास अन् माशा गोंधळतात
वैज्ञानिक मानतात की, माशा आणि डासांच्या डोळ्यांमध्ये अनेक लहान लेन्स असतात, ज्यांना कंपाऊंड आईज (compound eyes) म्हणतात. जेव्हा त्यांच्या डोळ्यांवर तेजस्वी प्रकाश पडतो, तेव्हा त्यांची दृष्टी गोंधळते. यामुळे ते सहजपणे त्यांच्या मार्गापासून भरकटतात आणि पळून जातात.
advertisement
असा करा सहज सोपा अन् भन्नाट उपाय
ही पद्धत केवळ स्वस्तच नाही तर बनवायलाही खूप सोपी आहे. यासाठी तुम्हाला एक पारदर्शक प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे, ती अर्धी पाण्याने भरायची आहे, त्यानंतर त्यात ॲल्युमिनियम फॉइलचे लहान गोळे टाकायचे आहेत. यानंतर पिशवी घट्ट बांधून ती खिडकी किंवा दारावर टांगायची आहे.
हे ही वाचा : प्रवासात बाटलीबंद पाणी घेताय? त्यातील नळाचं की मिनरल 'कसं' ओळखाल? बाटलीवरचं 'हे' कोडिंग नक्की वाचा...
हे ही वाचा : भारतात सर्वाधिक आयुष्य कोणत्या राज्यातील लोक जगतात? काय आहे यामागचं गुपित?