TRENDING:

विवाहित पुरुषाच्या प्रेमात का पडतात महिला? रिलेशनशिप तज्ज्ञ सांगतात, 'या' चुका टाळा; नाहीतर...

Last Updated:

प्रेम ही एक सुंदर भावना आहे, यात शंका नाही. पण जेव्हा ही भावना एका विवाहित पुरुषाशी जोडली जाते, तेव्हा त्याचे परिणाम खूप वेदनादायक असू शकतात. आपल्या आजूबाजूला अशा...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रेम ही एक सुंदर भावना आहे, यात शंका नाही. पण जेव्हा ही भावना एका विवाहित पुरुषाशी जोडली जाते, तेव्हा त्याचे परिणाम खूप वेदनादायक असू शकतात. आपल्या आजूबाजूला अशा अनेक मुली दिसतात, ज्या विवाहित पुरुषांच्या प्रेमात आकंठ बुडतात. पण असे केल्याने काहीही चांगलं होत नाही, उलट भावनिक आणि मानसिक त्रास (Emotional and mental problems) वाढतो. या विषयावर रिलेशनशिप तज्ज्ञ सांगतात की, अनेक महिला नकळत अशा चुका करतात, ज्यामुळे त्या विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडतात. यासाठी त्यांनी खालील गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला आहे...
Relationship Mistakes
Relationship Mistakes
advertisement

१. आकर्षण म्हणजे प्रेम नव्हे! अनेक स्त्रिया विवाहित पुरुषाची काळजी (Care), लक्ष (Attention) किंवा फ्लर्टिंगलाच (Flirting) खरं प्रेम समजण्याची चूक करतात. आकर्षण आणि भावनिक ओढ (Infatuation) हे तात्पुरते असू शकते. हे खरं प्रेम असेलच याची शाश्वती नसते. जर तुम्हाला केवळ थरार (Thrill) आणि साहसासाठी त्याची ओढ वाटत असेल, तर स्वत:ला विचारा: हे खरं प्रेम आहे की फक्त आकर्षण?

advertisement

२. आत्मसन्मानाला विसरणे: जी महिला विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडते, ती अनेकदा आपला आत्मसन्मान (Self-esteem) आणि आत्म-मूल्य (Self-worth) विसरून जाते. त्या नात्यासाठी स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न करतात किंवा आपल्या स्वतःच्या गरजा बाजूला ठेवतात. कोणत्याही नात्यात आत्मसन्मान सर्वात महत्त्वाचा असतो आणि त्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे.

३. 'बाऊंड्री' सेट न करणे: अनेक महिला विवाहित पुरुषावर इतकं प्रेम करतात की त्या त्यांच्या नात्यात कोणतीही भावनिक सीमा (Boundaries) ठेवत नाहीत. त्यामुळे त्या भावनिकदृष्ट्या असुरक्षित (Emotionally vulnerable) बनतात. विवाहित पुरुषाशी भावनिकरित्या जास्त गुंतण्याऐवजी, एक निश्चित सीमा आखणे नेहमीच योग्य ठरते.

advertisement

४. वास्तवाला दुर्लक्ष करणे: या नात्यात गुंतलेल्या महिला अनेकदा वास्तवाला (Reality) दुर्लक्ष करतात. 'एक दिवस तो माझ्यासाठी एकटा होईल आणि आम्हाला प्रेम मिळेल,' हा एक गोड भ्रम (Illusion) असतो. अशा नात्यात भावनिक दुखापत होण्याची शक्यता नेहमीच असते. त्यामुळे सत्य स्वीकारून त्या परिस्थितीतून स्वतःचे संरक्षण करणे शहाणपणाचे ठरते.

स्वत:ला महत्त्व द्या

advertisement

जर तुम्हाला विवाहित पुरुषाची ओढ वाटत असेल, तर सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे स्वतःला महत्त्व (Value Yourself) देणे आणि स्वतःची काळजी घेणे. मित्र, कुटुंब आणि छंद यांच्यासोबत वेळ घालवल्याने तुम्ही भावनिकदृष्ट्या मजबूत व्हाल. योग्य मार्गदर्शन आणि आत्मसन्मान जपूनच तुम्ही एका निरोगी आणि संतुलित नात्याकडे वाटचाल करू शकता.

हे ही वाचा : काजू-बदामाला किड लागली? 'हे' ५ उपाय पळवून लावतील किड्यांना, पुन्हा होणार नाही नुकसान

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रथ सप्तमीच्या दिवशी काय करावे? जाणून घ्या संपूर्ण पूजा विधी आणि महत्व
सर्व पहा

हे ही वाचा : नवरा सतत फोनवर असतो? 'अफेअर' नाही! जाणून घ्या यामागची ५ खरी कारणं...

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
विवाहित पुरुषाच्या प्रेमात का पडतात महिला? रिलेशनशिप तज्ज्ञ सांगतात, 'या' चुका टाळा; नाहीतर...
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल