आयुर्वेदानुसार शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. याविषयीचा आयुर्वेदिक दृष्टीकोन आणि त्याच्याशी संबंधित ही महत्त्वाची माहिती..आयुर्वेदानुसार, आपल्या पचनसंस्थेत वात, पित्त आणि कफ हे तीन दोष असतात आणि या तिन्हीचं प्रमाण संतुलित असणं आवश्यक आहे. यापैकी कोणत्याही प्रकाराचं प्रमाण असंतुलित असेल तर शरीरात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. शेंगदाणे हे गरम आणि जड अन्न मानलं जातं, जे पचवण्यासाठी शरीराला थोडे कष्ट करावे लागतात. शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया बिघडते, त्यामुळे पोटाचा त्रास होऊ शकतो.
advertisement
गर्भनिरोधक गोळ्यांबाबत महत्त्वाची बातमी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
पचनावर परिणाम
शेंगदाणे जड असल्यानं त्याचे पचन शरीरासाठी थोडे कठीण असते. जेव्हा आपण ते खातो तेव्हा आपल्या
शरीरात पाचक रस सक्रिय होतात ज्यामुळे त्याचं पचन व्यवस्थित होतं. या काळात पाणी प्यायलं तर पाचक रस पातळ होतात आणि शेंगदाणे पचण्यास त्रास होऊ शकतो. यामुळे गॅस, अपचन, पोटात जडपणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
Menopause मुळे महिलांचं जगणं आणखीनच कठीण, वाढतोय नवा धोका, कसा कराल स्वतःचा बचाव?
घसा आणि छातीत त्रास
शेंगदाणे गरम प्रकृतीचे असतात आणि जेव्हा तुम्ही ते खाता तेव्हा त्यांचा घसा आणि छातीत परिणाम होतो.यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्यास घसा आणि छातीत त्रास होऊ शकतो. यामुळे खोकला, घसा खवखवणं आणि श्वसनाचा त्रास होऊ शकतो.
चयापचयावर परिणाम
शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर चयापचयावरही परिणाम होतो. शेंगदाणे खाल्ल्यानंतर, आपलं शरीर ते पचवण्यासाठी अधिक ऊर्जा वापरतं आणि पाणी प्यायल्यामुळे ही प्रक्रिया मंदावते, ज्यामुळे वजन वाढू शकतं आणि चयापचय समस्या उद्भवू शकतात.
