पण असं का होतं? असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. पहिल्यांदा आई-वडिल होणाऱ्या कपलला असा प्रश्न पडतोच पडतो आणि ते गोंधळतात देखील.
गर्भावस्थेत पचनसंस्थेच्या तक्रारी सामान्य का असतात?
आधुनिक विज्ञान आणि आयुर्वेद या दोन्ही दृष्टिकोनांतून पाहिलं, तर गर्भावस्थेत पचनाशी संबंधित समस्या अतिशय सामान्य मानल्या जातात. विज्ञानानुसार, यामागचं प्रमुख कारण असतं ‘प्रोजेस्टेरोन’ नावाचं हार्मोन. गर्भावस्थेदरम्यान या हार्मोनची मात्रा शरीरात वाढते, ज्यामुळे शरीरातील अनेक स्नायू शिथिल होतात. त्यात पचनसंस्थेचे स्नायूही येतात.
advertisement
पचन प्रक्रिया मंदावल्याने अन्न दीर्घकाळ पोटात राहते, त्यामुळे गॅस तयार होतो आणि पोट जड वाटू लागतं.
आयुर्वेदानुसार, गर्भावस्थेदरम्यान वातदोषाचं असंतुलन होणं ही अशा तक्रारींची मुख्य कारणं मानली जातात. वातदोष वाढल्यास शरीरात गॅस, कोरडेपणा, जळजळ आणि कब्ज वाढतो. जर आहारात अनियमितता असेल किंवा स्त्री खूप वेळ उपाशी राहिली, तर ही स्थिती अधिक गंभीर होऊ शकते.
गर्भ वाढत असताना गर्भाशयाचा आकार वाढतो आणि त्यामुळे तो आतड्यांवर दबाव टाकतो. या दाबामुळे गॅस बाहेर निघणं कठीण होतं आणि तो पोटातच साचतो. कधी कधी या दाबामुळे श्वास घेण्यातही त्रास जाणवतो. याशिवाय, गर्भावस्थेत महिलांची हालचाल कमी होते, ज्याचा थेट परिणाम पचनक्रियेवर होतो.
अनेक स्त्रिया गर्भधारणेनंतर हेल्दी डाएट सुरू करतात जसं की भरपूर फळं, भाज्या, आणि संपूर्ण धान्य. हे पदार्थ आरोग्यदायी असले तरी त्यात फाइबरचं प्रमाण जास्त असल्याने अचानक मोठ्या प्रमाणात सेवन केल्यास गॅस वाढू शकतो, विशेषतः पुरेसं पाणी न घेतल्यास.
गॅस का तयार होतो?
जेवताना हवेसोबत गिळला जाणारा ऑक्सिजन देखील गॅस होण्याचं एक कारण आहे. जेव्हा आपण घाईघाईने खातो किंवा खाताना बोलतो, तेव्हा पोटात हवा जाते. त्यामुळे गॅस आणि फुगलेपण जाणवतं. म्हणूनच डॉक्टर नेहमी सावकाश आणि शांतपणे जेवण्याचा सल्ला देतात आणि हा सल्ला आयुर्वेदातही दिला जातो.
उपाय काय?
गर्भावस्थेत कोणताही उपाय करताना सावधगिरी आवश्यक असते. त्यामुळे नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय सर्वात योग्य मानले जातात. पुरेसं पाणी पिणं, हलकी हालचाल करणं आणि संतुलित आहार घेणं हेच पचन सुधारण्यासाठी आणि गॅस कमी करण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहेत.