TRENDING:

Covid 19 ची भीती कायमस्वरुपी नष्ट होणार? अखेर शास्त्रज्ञांनी शोधून काढला प्रभावी उपाय

Last Updated:

2019-2020 मध्ये आलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला होता. भविष्यात त्याचं म्युटेशन होऊन नवीन घातक व्हेरियंट तयार होण्याची भीती आहे. त्यामुळे शास्त्रज्ञ सातत्याने त्यावर संशोधन करत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोरोना व्हायरसचा प्रतिकार करण्यासाठी सुरू असलेल्या संशोधनात शास्त्रज्ञांना मोठं यश मिळालं आहे. शास्त्रज्ञांनी एका नवीन अँटिबॉडीचा शोध लावला आहे. ही अँटिबॉडी कोरोनाच्या प्रत्येक व्हेरियंटचा सामना करू शकते. साधारण चार वर्षांपूर्वी संपूर्ण जगात कोरोना व्हायरसमुळे कोविड-19 महामारी पसरली होती. त्यात कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला होता. शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी काही लसी देखील बनवल्या होत्या. पण, भविष्यात कोरोनाचे नवीन आणि प्राणघातक व्हेरियंट अस्तित्वात आले तर त्यांचा सामना कसा करायचा? हा प्रश्न टिकून होता. पण, आता शोध लागलेल्या अँटिबॉडीमुळे शास्त्रज्ञांना या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. 'न्यूज 24 ऑनलाइन'ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
आता कोविड 19 हा जगभरात एक स्थानिक आजार मानला जात आहे. वेगवेगळ्या भागांत कोरोनाचे वेगवेगळे व्हेरिएंट असू शकतात.
आता कोविड 19 हा जगभरात एक स्थानिक आजार मानला जात आहे. वेगवेगळ्या भागांत कोरोनाचे वेगवेगळे व्हेरिएंट असू शकतात.
advertisement

शास्त्रज्ञांनाच्या मते, आता कोविड 19 हा जगभरात एक स्थानिक आजार मानला जात आहे. वेगवेगळ्या भागांत कोरोनाचे वेगवेगळे व्हेरिएंट असू शकतात. भविष्यात त्यांचा उद्रेक झाला तर सर्वांवर उपचार करणं कठीण होऊ शकतं. पण, आता शोधलेल्या अँटिबॉडीमुळे या व्हेरिएंटशी लढू शकते. कारण, तिच्यामध्ये सार्स-कोविड-2 आणि त्याच्याशी संबंधित सर्व व्हायरस नष्ट करण्याची क्षमता आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही अँटिबॉडी येणाऱ्या पिढीसाठीही प्रभावी ठरेल आणि सुरक्षा प्रदान करेल.

advertisement

आठवड्यातून इतकी पावलं चाललो तरच होईल चालण्याचा फायदा, तज्ज्ञांनी सांगितलेला आकडा एकदा पाहाच

एका मासिकात प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, टेक्सास युनिर्व्हसिटी आणि चॅपल हिल येथील नॉर्थ कॅरोलिना युनिर्व्हसिटीतील संशोधकांनी एक रिसर्च केला होता. आपल्या रिसर्च दरम्यान त्यांना SC27 नावाची अँटिबॉडी आढळली आहे. अनेक व्हायरसच्या सानिध्यात या अँटिबॉडीची लॅबमध्ये वारंवार चाचणी करण्यात आली आहे. ही अँटिबॉडी उपचारांत सर्वात प्रभावी ठरली आहे.

advertisement

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही अँटिबॉडी सार्स-कोविड-2, 2003 मधील सार्स व्हायरस आणि बॅट कोरोना व्हायरसला देखील निष्प्रभ करू शकते. ही अँटिबॉडी हायब्रिड इम्युनिटी असलेल्या 60 टक्के लोकांमध्ये आढळली आहे. ती मानवी रोगप्रतिकारक शक्ती आणखी सुधारण्यासाठी काम करते. यामध्ये कोविड लसीकरणामुळे इम्युनिटी बळकट झालेल्या आणि संक्रमणातून बऱ्या झालेल्या लोकांचा देखील समावेश आहे. सध्या शास्त्रज्ञांची टीम भविष्यातील उपयोगासाठी या अँटिबॉडीची रचना करण्याचा विचार करत आहे.

advertisement

Monkeypox Symptoms: मंकीपॉक्सचा विळखा कसा ओळखावा? ही लक्षणे दिसताच धोका समजून जा

2019-2020 मध्ये आलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला होता. कोरोना अजूनही अस्तित्वात असला तरी तो आता पूर्वीसारखा प्राणघातक राहिलेला नाही. मात्र, भविष्यात त्याचं म्युटेशन होऊन नवीन घातक व्हेरिएंट तयार होण्याची भीती आहे. त्यामुळे शास्त्रज्ञ सातत्याने त्यावर संशोधन करत आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Covid 19 ची भीती कायमस्वरुपी नष्ट होणार? अखेर शास्त्रज्ञांनी शोधून काढला प्रभावी उपाय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल