आठवड्यातून इतकी पावलं चाललो तरच होईल चालण्याचा फायदा, तज्ज्ञांनी सांगितलेला आकडा एकदा पाहाच

Last Updated:

चालण्याच्या व्यायामाला कोणत्याही साधनाची किंवा प्रशिक्षकाची गरज नसते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे चालणं हा कोणत्याही वयात करता येण्यासारखा व्यायाम आहे.

चालण्याच्या व्यायामाला कोणत्याही साधनाची किंवा प्रशिक्षकाची गरज नसते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे चालणं हा कोणत्याही वयात करता येण्यासारखा व्यायाम आहे.
चालण्याच्या व्यायामाला कोणत्याही साधनाची किंवा प्रशिक्षकाची गरज नसते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे चालणं हा कोणत्याही वयात करता येण्यासारखा व्यायाम आहे.
नवी दिल्ली: सध्या अनेकांना कामाच्या तणावामुळे आपल्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. अनेकजण कमी वयातच हाय ब्लडप्रेशर, डायबेटिस अशा समस्यांनी त्रस्त आहेत. हे सर्व टाळण्यासाठी नियमित व्यायाम करणे, हा सर्वात सोपा उपाय आहे. व्यायामामध्ये चालणे हा एक असा व्यायाम आहे जो कोणत्याही वयात सहज करता येतो.
आजकाल स्मार्ट वॉच घालण्याचा ट्रेंड आहे. अशा प्रकारची घड्याळं वेळ दाखवतात सोबतच पल्स रेट आणि दिवसभरात आपण किती पावलं चाललो आहोत, याची देखील नोंद ठेवतात. 'एनडीटीव्ही'ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
चालण्याच्या व्यायामाला कोणत्याही साधनाची किंवा प्रशिक्षकाची गरज नसते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे चालणं हा कोणत्याही वयात करता येण्यासारखा व्यायाम आहे. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी दररोज किती पावलं चाललं पाहिजे, याबाबत नेहमीच दुमत आहे. दिवसाला 10 हजार पावलं चालणं सर्वोत्तम सांगितलं जातं. पण तुमच्या वयानुसार तुम्ही कमी-जास्त चालू शकता.
advertisement

चालण्याचे फायदे

दररोज चालण्याचे अनेक फायदे आहेत. दररोज चालल्याने शरीर ॲक्टिव्ह राहतं. डायबेटिस, हार्ट डिसीजेस, स्ट्रोक, लठ्ठपणा, डिप्रेशनसारख्या लाइफस्टाइल संबंधित आजार टाळता येतात. एखाद्याला सांधेदुखीची समस्या असेल तर नियमित चालल्याने वेदनांपासून आराम मिळू शकतो.
एका रिसर्चमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ज्या व्यक्ती आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा पाच हजारांहून अधिक पावलं चालतात त्या दीर्घायुषी होऊ शकतात. काही महिन्यांपूर्वी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एका व्यक्तीने किती चाललं पाहिजे, याबाबत संशोधन करण्यात आलं. या संशोधनात असं निदर्शनास आलं की, एखादी व्यक्ती सलग दोन वर्षे आठवड्यातून तीन वेळा किमान पाच हजार पावलं चालली तर तिचं आयुष्य आणखी तीन वर्षांनी वाढू शकतं. यामुळे व्यायामाशी संबंधित अतिरिक्त खर्चही जवळपास 13 टक्क्यांनी कमी होऊ शकतो.
advertisement
माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, काही लोक दररोज रात्री जेवल्यानंतर एक किंवा दोन किलोमीटर चालतात. यातून पचन सुधारतं. पण, जास्त ऊर्जा खर्च करणे देखील हानिकारक आहे. तज्ज्ञ म्हणतात की, रात्री दोन किलोमीटर चालण्याऐवजी फक्त 100 पावलं चाललं पाहिजे. 100 पावलं चालल्यानंतर पोटात जठराग्नि प्रदीप्त होतो आणि पचन सुधारतं. यापेक्षा जास्त चालल्यास शरीरातील ऊर्जा वाया जाते.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
आठवड्यातून इतकी पावलं चाललो तरच होईल चालण्याचा फायदा, तज्ज्ञांनी सांगितलेला आकडा एकदा पाहाच
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement