या ऋतूत फळं आणि भाज्यांची कमतरता भासत नाही, व ते खाण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हिवाळ्यात अशा अनेक भाज्या असतात, ज्यांचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास शरीराचे थंडीपासून संरक्षण होते, व फ्लूपासूनही आराम मिळतो. चला तर, या भाज्या नेमक्या कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ.
नोएडा येथील डाएट मंत्राच्या संस्थापक कामिनी सिन्हा यांच्या मते, थंड हवामानात आपल्या शरीराचा चयापचय दर मंदावतो, पचनसंस्थेवर परिणाम होतो. अशा वेळी योग्य आहार घेणं खूप गरजेचं आहे. हिवाळ्यात थंड पदार्थ खाणे टाळावे आणि गरम पदार्थ खावे. जंक फूड टाळणंदेखील खूप महत्त्वाचं आहे. कारण जंक फूडमुळे या ऋतूत व्यक्ती लवकर आजारी पडू शकतो. हिरव्या भाज्या आणि हंगामी फळांचे भरपूर सेवन करावे. याशिवाय आले, लसूण, मध, लिंबू अशा गोष्टींचा आहारात समावेश करावा, जेणेकरून थंडीचा प्रादुर्भाव कमी होऊ शकेल. रात्री दुधात चिमूटभर हळद मिसळून ही पिऊ शकता. यामुळे सर्दी-खोकला दूर होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढेल.
advertisement
हिवाळ्यात 'या' आहेत सर्वोत्तम 5 भाज्या
आहारतज्ज्ञ कामिनी यांच्या मते, 'हिवाळ्यात पालक सुपरफूड मानले जाते. ही भाजी पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आहे. पालकामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे, लोह आणि कॅल्शियम असते. हिवाळ्यात पालकाचे सेवन केल्यास निरोगी राहता येते. तुह्मी पालकाचा रस किंवा सूप देखील बनवून पिऊ शकता. पालक अँटीऑक्सिडंट्स प्रदान करते, जे रोगांपासून संरक्षण करू शकते.'
थंड हवामानात गाजराचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरते. गाजर बीटा कॅरोटीनचा चांगला स्रोत आहे, जी तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करते. हिवाळ्यात गाजर खाल्ल्यानं तुम्ही सिझनल फ्लूला बळी पडणार नाही. तसेच डोळ्यांसाठी ते खूप फायदेशीर आहे. गाजर मेंदूचे आरोग्य चांगले ठेवते आणि रक्त स्वच्छ करते
हिरवे वाटाणे प्रथिने, पोटॅशियम, फायबर आणि झिंकचा खूप चांगला स्रोत आहे. यात सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. हिरवे वाटाणे फायबरनं समृद्ध असतात, आणि पचनसंस्थेसाठी फायदेशीर मानले जातात.
मुळा हिवाळ्यात सुपरफूडप्रमाणे काम करते. मुळा व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी तसेच पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे. जर तुम्ही डायबेटिक किंवा प्री-डायबेटिक असाल तर मुळ्याचे सेवन खूप फायदेशीर आहे. हे मूत्रपिंड आणि यकृत साफ करू शकते.
हिरव्या भाज्यांबद्दल बोलायचे झाले तर केळी हिवाळ्यासाठी चांगले मानले जातात. केळामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि वनस्पती संयुगे भरपूर प्रमाणात असतात. या भाजीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे थंड हवामानात रोगांपासून संरक्षण करतात. केळामध्ये व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असते. जे डोळे, हाडांच्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी महत्त्वपूर्ण असते.