विंटर स्पेशल फेस पॅकमुळे हिवाळ्यातही त्वचेवरचा ग्लो कायम राहिल. आयुर्वेदिक डॉक्टर शोभना यांनी हा व्हिडिओ इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे.
Obesity : वजन कमी करायचंय ? या दैनंदिन सवयींमुळे वजन येईल आटोक्यात
विंटर स्पेशल फेस पॅकसाठी साहित्य- एक चमचा मसूर, एक चमचा ओट्स, केशराचे 8-10 धागे, एक चमचा बेसन, एक टेबलस्पून तांदळाचं पीठ, पाव कप कस्तुरी हळद, बटाट्याचा रस, दोन टेबलस्पून दही असं साहित्य लागेल.
advertisement
फेसपॅक बनवण्यासाठी एक टेबलस्पून मसूर डाळ, एक टेबलस्पून ओट्स आणि केशराच्या काड्या बारीक वाटून घ्या. ही पावडर एका भांड्यात ठेवा आणि त्यात एक टेबलस्पून बेसन, एक टेबलस्पून तांदळाचं पीठ, पाव कप हळद, बटाट्याचा रस आणि दोन टेबलस्पून दही घाला. हे साहित्य चांगलं मिसळा फेस पॅक तयार होईल.
Mouth Odour : दात घासल्यावरही तोंडाचा वास येतो ? जाणून घ्या कारणं, उपचारपद्धती
हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा, चांगलं स्क्रब करा आणि वीस मिनिटं तसंच राहू द्या. नंतर, चेहरा धुवा. यामुळे त्वचा एक्सफोलिएट होते, हा फेस पॅक टॅनिंग काढून टाकण्यासाठी आणि त्वचेला मॉइश्चराइझ ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. आठवड्यातून दोनदा हा फेस पॅक लावता येतो. कोणतीही एलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
