आजच्या काळात महागाईमुळे भाजीपाल्याचे दर सतत वाढत-घटत असतात, पण तुम्हाला माहिती आहे का की जगातली सर्वात महाग भाजी कोणती आहे? तिची किंमत ऐकली तर तुमचे डोळे विस्फारतील.
या भाजीची किंमत आहे 80 हजार ते 1 लाख आता तुम्हाला ही भाजी कोणती असेल असा प्रश्न नक्कीच पडला असेल आणि त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली असेल?
advertisement
जगातली सर्वात महाग भाजीचं नाव आहे हॉप शूट्स (Hop Shoots). ही भाजी केवळ चवीला खास नसून, औषधी गुणांनीही परिपूर्ण आहे. हॉप शूट्स हा एक प्रकारचा वनस्पतीचा भाग आहे, जो मुख्यतः थंड हवामानात वाढतो. त्याची शेती करायला जवळपास तीन वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळेच ही भाजी दुर्मिळ आणि अत्यंत किमती ठरते.
कुठे मिळते आणि किती महाग आहे ही भाजी?
हॉप शूट्स प्रामुख्याने उत्तर अमेरिका, युरेशिया आणि दक्षिण अमेरिका या प्रदेशांमध्ये उगवली जाते. भारतात मात्र ही भाजी उगवणे जवळपास अशक्य आहे, कारण तिला अतिशय थंड वातावरणाची गरज असते. काही शेतकरी प्रयत्न करतात, पण यश मिळवणे कठीणच ठरतं.
1 किलो हॉप शूट्सची किंमत तब्बल 80 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत असते. या किमतीमुळेच ती जगातील सर्वात महाग भाजी म्हणून ओळखली जाते.