दह्यातचं पिवळं पाणी म्हणजे दह्याच्या विरजणातील निवळ. जेव्हा दही काही वेळासाठी ठेवलं जातं तेव्हा नैसर्गिरित्या हे पाणी तयार होऊन दह्यातून बाहेर येतं. हे खराब पाणी नाही किंवा याचा अर्थ दही खराब झाला असाही नाही. हा दुधातील पाण्यात विरघळलेला असा भाग आहे.
Expert Tips : मुलांना सर्दी-खोकला असेल तर केळं द्यायचं की नाही? डॉक्टर काय सांगतात?
advertisement
हे पाणी म्हणजे तुमच्या आरोग्यासाठी लिक्विड सोनंच. यामध्ये बरेच पौष्टीक, शक्तिशली घटक असतात. यामध्ये मुबलक प्रोटिन असतं, जे मसल्स मजबूत करायला आणि रिपेअर करायला मदत करतं. यामध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरस असतं, ज्यामुळे हाडांना मजबुती मिळते. यात पोटॅशिअम असतं, ते हार्ट आणि नर्व्ह्स फंक्शनला सपोर्ट करतं. यातील झिंक आणि कॉपर रोगप्रतिकारक शक्ती आणि त्वचेसाठी चांगलं आहे. यातील प्रोयाबोटिक्स आतड्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत.
त्यामुळे हे पाणी फेकणं म्हणजे तुम्ही तुम्ही तुम्हाला मिळणारे पोषक घटक फेकून देत आहात. मग आता यापुढे दह्यातील हे पाणी किंवा पूर्ण दही खराब समजून फेकू नका तर ते दह्यातच मिक्स करा किंवा प्या. ते वाया घालवू नका. आहारतज्ज्ञ रजत जैन यांनी त्यांच्या @dietitianrajatjain इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही माहिती दिली आहे.
भारतात जंक फूड आहे पिझ्झा, मग इटलीत लोक तो दररोज खाऊनही हेल्दी कसे राहतात?
दह्यातील या पाण्याला तुम्ही आजवर काय समजत होता, त्याचा काय आणि कसा वापर करता ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.