नाशिक : दागिने हा प्रत्येक महिलेचा आवडीचा विषय. दागिने परिधान करणे हे प्रत्येक महिलेला आवडत असतं. त्यातल्या त्यात जर सोन्याचे दागिने असतील तर अजूनच आवडतात. पण सध्याला सोन्याचे भाव वाढलेले आहेत आणि सोने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेलेले आहेत. त्यामुळे तुम्ही सोन्याला उत्तम पर्याय म्हणून काही बघत असाल तर नाशिकमधून तुम्ही वामिका कलेक्शन या ठिकाणाहून वनग्रॅम गोल्ड ज्वेलरी दागिने खरेदी करू शकणार आहात. तुम्हाला नाशिक शहरातील अशोकामार्ग परिसरामध्ये हे वनग्रॅम गोल्ड ज्वेलरीचे दागिने स्वस्तात खरेदी करता येणार आहेत.
advertisement
कुठे कराल खरेदी?
नाशिक शहरातील अशोकमार्ग रस्त्यावरील जून सागर स्वीट समोरच वामिका कलेक्शन या नावाने दिसणार आहे. या ठिकाणाहून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वनग्रॅम गोल्ड ज्वेलरीचे दागिने मिळतील. या ठिकाणी तुम्हाला हुबेहूब जशा सोन्याच्या दागिन्यांच्या डिझाईन असतात तशाच डिझाईन वनग्रॅम गोल्ड ज्वेलरीमध्ये मिळतील.
कोणत्या प्रकारचे मिळतात दागिने?
वन ग्रॅम गोल्ड मंगळसूत्र, मॅट फिनिशिंग मंगळसूत्र, कानातले, झुमके, बांगड्या, ब्रायडल ज्वेलरी सेट, पाटल्या, राणी हार, पोहे हार, टेम्पल ज्वेलरी, बुगड्या, शॉर्ट मंगळसूत्र, चोकर, लांब गळ्यातले, साखळी, ब्रासलेट, साउथ इंडियन ज्वेलरी, नाकातले, कोल्हापुरी साज, ज्येष्ठासाठी वनग्रॅम अंगठी, कानातील बाही, हातातील ब्रेसलेट, चैन, गोफ असे विविध प्रकारचे दागिने याठिकाणी खरेदीसाठी उपलब्ध आहेत. तसेच चांदीच्या प्रतीचे देखील दागिने आणि भेटवस्तू यांच्याकडे उपलब्ध आहेत.
काय आहेत दागिन्यांच्या किमती?
वनग्रॅम गोल्ड ज्वेलरीचे दागिने हे 99 रुपयांपासून मिळायला सुरू होतात. तर तुम्हाला 7-8 हजारांपर्यंत हे सर्व दागिने भेटून जातील. प्रत्येक दागिन्यांची किंमत ही वेगवेगळी त्यांच्या प्रकारानुसार असणार आहे.
जर तुम्हाला सुद्धा वनग्रॅम गोल्ड ज्वेलरीचे दागिने खरेदी करायचे असतील आणि या वनग्रॅम गोल्ड दागिन्यांचा स्वतःचा व्यवसाय जरी सुरू करायाचा असल्यास तुम्हाला आमच्याकडून योग्य दरात आपला व्यवसाय करण्यासाठी मदत देखील मिळणार असल्याचे दुकान चालक प्रियांक सोनवणे यांनी सांगितले आहे.