TRENDING:

दिवाळीत गिफ्ट करा छान असा ड्रायफ्रूट सेट, पण मुंबईत कुठे मिळतो, दरही जाणून घ्या..

Last Updated:

dryfruit set mumbai - दिवाळीच्या निमित्ताने तुम्हालाही एखादे छान गिफ्ट द्यायचे असेल तर तुम्ही छान आणि सुंदर असा ड्रायफ्रूट सेट गिफ्ट करू शकता. तर मग त्याचे दर नेमके काय आहेत, ते तुम्ही कुठे खरेदी करू शकता, याचबाबत लोकल18 टीमने घेतलेला हा आढावा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
निकिता तिवारी, प्रतिनिधी
advertisement

मुंबई - नवरात्री आणि दसरा सण संपल्यावर आता दिवाळीचे वेध लागले आहे. हा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी म्हटल्यावर बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. सध्या मुंबईमध्येही दिवाळीनिमित्त सर्व बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. याच दिवाळीच्या निमित्ताने तुम्हालाही एखादे छान गिफ्ट द्यायचे असेल तर तुम्ही छान आणि सुंदर असा ड्रायफ्रूट सेट गिफ्ट करू शकतात. तर मग त्याचे दर नेमके काय आहेत, ते तुम्ही कुठे खरेदी करू शकता, याचबाबत लोकल18 टीमने घेतलेला हा आढावा.

advertisement

मुंबईमध्ये दिवाळीची खरेदी करायची असेल तर मुख्य बाजारांपैकी एक बाजार म्हणजे क्रॉफर्ड मार्केट मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशनपासून 10 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या या मार्केटमध्ये तुम्हाला अनेक वस्तू कमी दरात मिळून जातील. दिवाळीनिमित्त जर तुम्हाला फराळासाठी काजू, बदाम, मनुके आणि पिस्ता असे वेगवेगळे ड्रायफ्रूट विकत घ्यायचे असतील तर मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमधील भेके आणि कंपनी या दुकानाला नक्की भेट देऊ शकतात.

advertisement

काजू, बदाम हे सर्व ड्रायफ्रूट तुम्हाला इथे विकत मिळतील. पण त्या व्यतिरिक्त आकर्षक असे गिफ्ट सेटही तुम्हाला इथे कमी दरात उपलब्ध होतील. कोणाला भेटवस्तू म्हणून ड्रायफ्रूटचा सेट द्यायचा असेल तर या ठिकाणी सर्व ड्रायफ्रूटच्या सेटच्या व्हरायटी मिळून जातील.

ड्रायफ्रूटचे प्रति किलो दर पुढीलप्रमाणे -

  • काजू 1000 रुपये,
  • बदाम 780 ते 1200-1400 रुपयांपर्यंत,
  • advertisement

  • मणुके 400 ते 800 रुपये,
  • पिस्ता सॉल्टेड 1200 रुपयांपासून, जर साधा पिस्ता असेल तर 2200 रुपये,
  • अंजीर 1200 रुपये एवढा दर सध्या सुरू आहे.

ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई, साताऱ्यात आज नळाला पाणी नाहीच! कारण काय?

ड्रायफ्रूट सेट दर पुढीलप्रमाणे -

  • 6 ड्रायफ्रूट 600 ग्रॅम 1200 रुपये,
  • 4 ड्रायफ्रूट 400 ग्रॅम 700 रुपये,
  • advertisement

  • 4 ड्रायफ्रूट 50 ग्रॅम 350 रुपये,
  • 6 ड्रायफ्रूट 50 ग्रॅम 600 रुपये,
  • 4 ड्रायफ्रूट 200 ग्रॅम 900 रुपये,
  • 4 ड्रायफ्रूट 100 ग्रॅम 450 रुपये हे दर ड्रायफ्रूटच्या निवडीनुसार कमी जास्त होत असतात.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
दिवाळीत गिफ्ट करा छान असा ड्रायफ्रूट सेट, पण मुंबईत कुठे मिळतो, दरही जाणून घ्या..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल