TRENDING:

Weight loss: काजू-बदाम खाऊन खरंच वजन कमी होऊ शकतं का? आश्चर्यकारक माहिती समोर

Last Updated:

सुका मेवा म्हणजे ड्रायफ्रुट्सचं प्रमाण महत्त्वाचं आहे. कारण सुक्या मेव्याचे फायदे आणि तोटेही आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: वजन कमी करणं म्हणजे मोठं आव्हान. अशावेळी आपल्याच घरातले काही जिन्नस वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. वजन वाढतं वेगानं पण ते कमी करणं ही एक मोठी प्रक्रिया आहे. आणि त्यासाठी लागते चिकाटी. कारण, वजन ज्या वेगानं वाढतं तितक्या वेगानं कमी करणं अधिक कठीण आहे. मखाणा आणि काही ड्रायफ्रुट्सचा यासाठी तुम्हाला उपयोग होऊ शकतो. पाहूयात ते खाण्याचं योग्य प्रमाण..
advertisement

वजन कमी करण्यासाठी आहार हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो, पण त्या आहारामध्ये पौष्टिक अन्न देखील महत्त्वाचे आहे.

तुम्हाला वजन कमी करायच असेल तर तुमच्या आहारात मखाणाचा समावेश नक्की करा.

(दातदुखीवर आयुर्वेदिक तज्ज्ञांनी सांगितला रामबाण इलाज; घरच्या घरी करू शकाल हे औषध)

मखाणानं वजन कमी कसं करावं?

मखाणा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मखाणामध्ये तंतूमयता, प्रथिनं, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात. त्यामुळे त्याला सुपरफूड म्हटलं जातं. हे खाल्ल्यानं शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. मखाणा हा कमी उष्मांक असलेला खाद्यपदार्थ आहे, ज्यामुळे वजन कमी करण्यास देखील मदत होते. यामुळे भूक भागते. त्यामुळे अतिरिक्त खाणं टळतं.

advertisement

 सुक्या मेव्याबद्दलची माहिती

सुका मेवा म्हणजे ड्रायफ्रुट्सचं प्रमाण महत्त्वाचं आहे. कारण सुक्या मेव्याचे फायदे आणि तोटेही आहेत. वजन कमी करण्यासाठी अक्रोड, बदाम आणि पिस्ता याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.

मेवा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याच्या सेवनानं शरीरातली पोषक तत्वांची गरज भागते. वजन कमी करण्यासाठी बदाम आणि अक्रोड खावेत, कारण त्यात मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड चांगले फॅट्स असतात, जे शरीराला चांगल्या कॅलरीज देतात. ज्यामुळे वजन कमी होतं आणि दिवसभराची ऊर्जा शरीराला मिळते. वजन कमी करण्यासाठी सुका मेवा हा नाश्त्यासाठीचा सर्वोत्तम आहार आहे.अक्रोडमध्ये फायटोन्यूट्रिएंट्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे टाइप-2 मधुमेहाचा धोकाही कमी होतो. ते शरीरात सूज येण्याची समस्या देखील कमी होते.

advertisement

(कोथिंबिर-पुदिना चटणी ऐवजी फळांपासून करा चटणी; मुलांसाठी पौष्टिक आणि चवीला अप्रतिम)

बदाम अधिक फायदेशीर

वजन कमी करण्यासाठी बदाम खाणं उत्तम मानलं जातं. बदाम हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. दररोज 28 ग्रॅम

बदाम खाल्ल्यानं वजन नियंत्रित करता येतं. बदाम खाल्ल्यानं तुम्हाला पुरेशा प्रमाणात फायबरदेखील मिळतं,

जे दिवसभराची भूक नियंत्रित ठेवण्यात मदत करतं.

advertisement

पिस्त्याचे फायदे

पिस्त्यात भरपूर फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात. पिस्ते खाल्ल्यानं पचन सुधारतं. तसंच साखरेची पातळीही कायम राहते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सकाळी नाश्त्यात सुका मेवा खाऊ शकता. या सर्व गोष्टी एकत्रही खाता येतात. मखाणा चाट बनवूनही खाता येतं.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Weight loss: काजू-बदाम खाऊन खरंच वजन कमी होऊ शकतं का? आश्चर्यकारक माहिती समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल