कोथिंबिर-पुदिना चटणी ऐवजी फळांपासून करा चटणी; मुलांसाठी पौष्टिक आणि चवीला अप्रतिम

Last Updated:

सहसा तुम्ही हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिना इत्यादींपासून बनवलेली चटणी खाल्ली असेलच. पण आज आम्ही तुम्हाला एका अनोख्या चटणीबद्दल सांगणार आहोत.

News18
News18
बिन्नू बाल्मिकी
बहराइच (उत्तर प्रदेश): संपूर्ण भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने चटणी खाल्ली जाते. चटणी कशीही बनवली तरी त्याची चव जेवणाची चव दुप्पट करू शकते. सहसा तुम्ही हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिना इत्यादींपासून बनवलेली चटणी खाल्ली असेलच. नारळाची चटणीही दक्षिण भारतात सगळीकडे बनवली जाते. पण आज आम्ही तुम्हाला एका अनोख्या चटणीबद्दल सांगणार आहोत. ही चटणी सफरचंद, केळी, किवी, पपई, लसूण, कांदा, आले आणि ड्राय फ्रूट अशा गोष्टींपासून तयार केली जाते. उत्तर प्रदेशातील ही रेसिपी आहे.
advertisement
सफरचंदाची चटणी
सफरचंदाची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम चांगल्या प्रतीच्या सफरचंदांची निवड केली जाते. मग सफरचंद धुवून त्याचे छोटे छोटे तुकडे केले जातात. त्यापूर्वी सफरचंदाचे साल आणि बिया काढल्या जातात. सफरचंदात केळी, पपई, किवी, लसूण, कांदा, आले आणि ड्रायफ्रूट मिसळून हे तयार केले जाते. उत्तर प्रदेशाात बहराइच भागात ही चटणी करून विकली जाते.
advertisement
अॅपल चटणीची किंमत
सफरचंद आणि सफरचंदांच्या किंमतीनुसार फरक पडतो. पण सफरचंदाच्या चटणीची किंमत सफरचंदांपेक्षा जास्त आहे. कारण त्या्यात ड्रायफ्रुट्ससह इतर फळांची भर पडते. या चटणीचा वापर तुम्ही जॅम म्हणून करू शकता. जे पोळी, पराठा, ब्रेडसोबत आरामात खाऊ शकता. बहराइचमध्ये सफरचंदाची चटणी 300 रुपये किलो दराने मिळते.
मुलांनाही आवडते हेल्दी चटणी
मुलांनी सफरचंद, केळी, ड्रायफ्रूट्स अशी फळं खायला खूप मनवावं लागतं. पण मुलं सफरचंदाची चटणी अगदी सहजपणे खातात. अशा प्रकारे मुलांना ड्रायफ्रूटसोबत फळांमध्ये जीवनसत्त्वे मिळतात.
advertisement
ही चटणी बहराइचमध्येच तयार केली जाते, जी एक नव्हे तर महिलांच्या अनेक गटांनी मिळून बनवली आहे. बचत गटातील महिलांची ही खास रेसिपी आहे. या चटणीच्या मार्केटिंगमुळे महिलाही स्वयंपूर्ण होण्यास मदत मिळत आहे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
कोथिंबिर-पुदिना चटणी ऐवजी फळांपासून करा चटणी; मुलांसाठी पौष्टिक आणि चवीला अप्रतिम
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement