धाराशिवमधील मुरुम नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.पण मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रशेखर मुथकनना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असिप पटेल यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबीटीचे उमेदवार अजित चौधरी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता थेट शिवसेना भाजपमध्ये लढत होणार आहे.
advertisement
खरं तर यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी अर्ज भरला होता पण शेवटच्या दिवसाआधी त्याने माघार घेतली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचा उमेदवार उरला होता.पण मंगळवारी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत बैठक पार पडली होती. या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराने उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. या पाठिंब्यासह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रशेखर मुथकनना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असिप पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता.त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उमेदवाराच्या माघारीने आता मुरूम नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आता भाजपचे उमेदवार बापूराव पाटील व उद्धव ठाकरे यांचे उमेदवार अजित चौधरी यांच्या थेट लढत होणार आहे.त्यामुळे या लढतीत कोण बाजी मारतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कॉग्रेस,शरद पवार राष्ट्रवादी,एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी आणि मनसे अशा सगळ्या पक्षांची मोटं बांधून आम्ही एकत्र आला आहे. भाजपसारख्या मोठ्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सगळ्या ताकदी एकत्र येणे गरजेचे होते. त्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहे, असे शिवसेना युबीटीचे उमेदवार अजित चौधरी यांनी सांगितले आहे.
