मराठी मतदारांनी दशके जपलेला गिरगाव परिसर सध्या मोठ्या राजकीय हलचालींनी ढवळून निघालाय. स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत काम करणारी ‘आम्ही गिरगावकर’ ही संघटना आगामी निवडणुकीत थेट उतरू शकते, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 'आम्ही गिरगावकर' या संघटनेचे ८,२३२ सभासद आहेत. या हालचालीमुळे गिरगावातील पारंपरिक राजकीय गणित बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
advertisement
भाजपचे आमदार लोढा यांनी वाढवलं वर्चस्व...
गेल्या काही वर्षांत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या भागात भाजपने पूर्ण वर्चस्व निर्माण केले आहे. २००९ मध्ये युती असताना लोढांनी शिवसेनेच्या पाठिंब्याने पहिल्यांदा आमदार म्हणून प्रवेश केला. मात्र, मागील काही वर्षांतच गिरगावातील राजकीय समीकरणे वेगाने बदलली. सध्या गिरगावात फक्त एकाच वॉर्डात ठाकरे गटाचा नगरसेवक असून उर्वरित सर्व भाजपचे आहेत.
> वॉर्ड क्रमांक, माजी नगरसेवक आणि आताचं आरक्षण खालीलप्रमाणे
| वॉर्ड क्रमांक | नाव | पक्ष | आरक्षण |
|---|---|---|---|
| 114 | सरिता पाटील | भाजप | खुला |
| 215 | अरुंधती दुधवडकर | ठाकरे | अनुसूचित जाती |
| 216 | राजेंद्र नरवणकर | भाजप | OBC महिला |
| 217 | मीनल पटेल | भाजप | खुला |
| 218 | अनुराधा पोतदार | भाजप | खुला महिला |
| 220 | अतुल शहा | भाजप | खुला महिला |
| 221 | आकाश पुरोहित | भाजप | खुला |
| 222 | रिटा मकवाना | भाजप | OBC |
स्थानिक प्रश्नांसाठी स्थानिक संघटना मैदानात..
मात्र, आता कोणती पक्षाला नाही तर स्वतःच्या समस्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय गिरगावकरांनी घेतला आहे. मराठी माणसाला बेघर केलं जात असल्याचा सातत्याने आरोप होत आहे. त्याशिवाय, कबुतरखान्याच्या मुद्यावर वातावरण तापलं होते. मेट्रो बाधित पुनर्विकास योजनेतील लोकांना घरं, बेस्ट वीज, खराब रस्ते, पाण्याची समस्या, गटारांची अडचण, मैदाने अशा विविध मुद्यांवर 'आम्ही गिरगावकर' संघटना महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. यामुळे स्थानिक पक्षांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे .
