पुणे-मुंबई रद्द झालेल्या गाड्यांची यादी
परिवहन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, या अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विविध विभागांमधील एकूण १३९ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये ७३ ई-शिवनेरी आणि ६६ इतर बस फेऱ्यांचा समावेश आहे.
मुंबई सेंट्रल, दादर, ठाणे, बोरीवलीकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. पुढील काही तासासाठी बसेस फेऱ्या बंद राहणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिलेल्या आहेत. वाहतूक सुरळीत झाल्यानंतर पुढचा निर्णय कळवला जाईल, असे एसटी प्रशासनाने सांगितले.
advertisement
राज्य परिवहन विभागाची एकूण १६३ वाहने वाहतूक कोंडीत अडकली
तसेच, या एक्सप्रेस वेवर महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एकूण १६३ वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती. यामध्ये सातारा विभागातील ४६, सोलापूर विभागातील ३६, पुणे विभागातील २०, सांगली विभागातील १८, कोल्हापूर विभागातील १३, पालघर विभागातील १२, ठाणे विभागातील ११ आणि मुंबई विभागातील ७ वाहनांचा समावेश आहे.
बस सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करणार, राज्य परिवहन विभागाचे स्पष्टीकरण
प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, परिस्थितीचा आढावा घेऊन पर्यायी व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत होताच बस सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने कळविले आहे.
गॅस टँकर हटवण्याचे आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न
दरम्यान, प्रशासनाकडून गॅस टँकर हटवण्याचे आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कामाला विलंब होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे या कठीण परिस्थितीत स्थानिक सेवाभावी संस्था तसेच धर्मापाल तंतरपाळे यांनी पुढाकार घेत हजारो पाण्याच्या बाटल्या प्रवाशांना वितरित केल्या. त्यामुळे अनेक प्रवाशांना दिलासा मिळाला असून, काही प्रमाणात तरी आधार मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
