सुधाकर पवार हे छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. पद्मसिंह पाटील विद्यालयात मुख्यध्यापक आहेत. 2018 पासून ते सायकलिंग करत आहेत. त्यांना त्यांच्या मित्राकडून याची प्रेरणा मिळाली. सुरूवातीला त्यांनी फक्त शहरामध्ये सायकलिंग केली त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या आसपासच्या तालुक्यामध्ये जाऊन सायकलिंग करायला सुरुवात केली. जेव्हा त्यांना आत्मविश्वास आला की आपण आता मोठा पल्ला देखील सायकलिंगच्या माध्यमातून पूर्ण करू शकतो. त्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा संभाजीनगर पुणे असा प्रवास सायकलवर केला.
advertisement
यानंतर त्यांनी संपूर्ण भारतभर सायकलिंग करत प्रवास करण्याचे ठरवले. त्यानंतर त्यांनी दिल्ली, अयोध्या, कोलकत्ता पाँडिचेरी अशा विविध ठिकाणी त्यांनी सायकलवरती प्रवास केला. त्यानंतर त्यांनी सगळ्यात लांबचा प्रवास तू केला संभाजीनगर ते नेपाळ असा. आणि त्यांनी आता संभाजीनगर ते श्रीलंका असा सतराशे किलोमीटरचा पल्ला सायकलवरती पार केला आहे, यासाठी त्यांना 13 दिवस एवढा कालावधी लागला. 15 ऑक्टोबरला त्यांनी हा प्रवास सुरू केला आणि 27 ऑक्टोबर रोजी ते श्रीलंका या ठिकाणी पोचले. यासाठी त्यांना तब्बल तेरा दिवस लागले आणि 70 ते 75 हजारापर्यंतचा खर्च यासाठी लागला असल्याची माहिती सुधाकर पवार यांनी दिली.