TRENDING:

Jalgaon: आईला भेटायचं राहून गेलं! डोळ्यादेखत वैष्णवीने चंचलचा मृत्यू पाहिला, चाळीसगाव हळहळलं

Last Updated:

  चंचल आणि वैष्णवी या दोघी जणी दुचाकीवरून आईला भेटण्यासाठी  चाळीसगावकडून रहिपुरीकडे जात होत्या. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय वाघमारे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

चाळीसगाव: जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दसेगाव फाट्याजवळ एक भीषण अपघात झाला आहे. आईला भेटण्यासाठी जात असलेल्या 21 वर्षीय तरुणीला डंपरने चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात आणखी एक तरुणी गंभीर जखमी झाली असून उपचार सुरू आहे.  या घटनेमुळे चाळीसगावमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दसेगाव फाट्याजवळ दुपारच्या सुमारास ही घटना घडली.  चंचल लांडगे (वय 21) असं मृत तरुणीचं नाव आहे. तर वैष्णवी चौधरी असं जखमी झालेल्या तरुणीचं नाव आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.  चंचल आणि वैष्णवी या दोघी जणी दुचाकीवरून आईला भेटण्यासाठी  चाळीसगावकडून रहिपुरीकडे जात होत्या.

advertisement

धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दसेगाव फाट्याजवळ पोहोचल्या असताना अचानक पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या डंपरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. डंपरची धडक बसल्यामुळे दोघ्या जणी खाली कोसळल्या. या अपघातात 21 वर्षीय चंचल लांडगे हिचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, डंपरने काही अंतर दूर दोघींना फरफटत नेलं. या अपघातात चंचलची मैत्रीण वैष्णवी चौधरी ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे. जखमी झालेल्या वैष्णवीला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तिच्यावर उपचार सुरू आहे.

advertisement

 अपघातानंतर ग्रामस्थांचा रास्ता रोको आंदोलन 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, केळी अन् कांद्याचे भाव भूईसपाट, लिंबूला काय मिळाला दर?
सर्व पहा

अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत संताप व्यक्त केला. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असलं, तरी आरोपींना वाचवण्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. संबंधित डंपरमध्ये अवैध वाळू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी डंपर ताब्यात घेत चालक आणि क्लिनरला अटक केली आहे. पुढील तपास सुरू असून सीसीटीव्हीच्या आधारे सत्य समोर आणण्याचा पोलिसांचा दावा आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon: आईला भेटायचं राहून गेलं! डोळ्यादेखत वैष्णवीने चंचलचा मृत्यू पाहिला, चाळीसगाव हळहळलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल