TRENDING:

Sangali: सांगलीत 'मुळशी पॅटर्न' स्टाईल घटना, पाठलाग करून विष्णूला भर चौकात संपवलं, शहरात खळबळ

Last Updated:

काही वर्षांपूर्वी विष्णू वडेर याचा काही तरुणांशी वाद झाला होता. त्या वादातूनच ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली:  सांगलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  नवीन वर्षातल्या पहिल्याच दिवशी आणि ऐन निवडणुकीत सांगलीत एका २३ वर्षीय तरुणाचा पाठलाग करून धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
News18
News18
advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली शहरातल्या कॉलेज कॉर्नर जवळील केडब्लूसी कॉलेजच्या शेजारी घडली आहे. विष्णू वडेर (वय 23) असं मृत तरुणाचं नाव आहे. विष्णू वडेर हा तरुण चौकातून जात होता. त्यावेळी टोळक्याने विष्णू वडेर याच्यावर हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी विष्णूने पळ काढला. पण टोळक्याने  केडब्लूसी कॉलेजजवळ त्याला गाठलं आणि धारदार शस्त्राने सपासप वार केले. धारदार शस्त्राने वार झाल्यामुळे विष्णू वडेर  रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर कोसळला.

advertisement

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला.  मयत तरुण विष्णू वडेर याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.  भर दिवसा घडलेल्या खुनाच्या घटनेने शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळद खातीये चांगलाच भाव, शेवगा आणि डाळींबाला आज काय मिळाला दर? इथं चेक करा
सर्व पहा

काही वर्षांपूर्वी विष्णू वडेर याचा काही तरुणांशी वाद झाला होता. त्या वादातूनच ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पूर्व-वैमनस्यातून ही घटना घडली असावी, असं पोलिसांनी सांगितलं. घटनास्थळी सांगली शहराचे पोलीस उपाधीक्षकांसह शहर पोलिसांनी धाव घेऊन पाहणी केली.  संशयितांचा शोध सुरू केला आहे. या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस तपासत आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sangali: सांगलीत 'मुळशी पॅटर्न' स्टाईल घटना, पाठलाग करून विष्णूला भर चौकात संपवलं, शहरात खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल