मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील ओझर, पिंपळगाव आणि मालेगाव परिसरातील सुमारे ५० भाविक उत्तर भारतातील तीर्थयात्रेसाठी खासगी बसने गेले होते. मात्र आज शनिवारी पहाटे कानपूरजवळ त्यांच्या बसचा अपघात झाला. बसवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस एका ट्रकवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, बसच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. या अपघाताच बस चालकाचा जागेवर मृत्यू झाला. तर काही प्रवासी जखमी झाले होते. तर काही भाविक किरकोळ जखमी झाले होते. जखमींना तातडीने कानपूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं.
advertisement
बसमध्ये होते ५० भाविक, मृतांचा आकडा ५ वर
या बसमध्ये नाशिकमधील निफाड येथील ५० भाविक होते. बसला अपघात झाल्यानंतर काही जणांना खिडक्या फोडून बाहेर काढण्यात आलं होतं. या अपघातात काही भाविक हे जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन भाविकांना रुग्णालयात दाखल केलं. सकाळी बसचालकाचा मृत्यू झाला होता. तर उपचारादरम्यान, संध्याकाळी ५ भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मृत भाविक लोणवाडी,कुंभारी, ओझर येथील असल्याची माहिती समोर आली आहे,
अपघाताची माहिती मिळताच नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कानपूर जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत जखमी भाविकांना आवश्यक ती मदत करण्याची विनंती केली. जखमींना कानपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनाकडून वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनीही कानपूर प्रशासनाशी संपर्क साधत जखमी भाविकांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावण्याची विनंती केली होती. महाराष्ट्रातील भाविकांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
