TRENDING:

Pune Railway Station: पुणे रेल्वे स्टेशन कात टाकणार! रेल्वे बोर्डाच्या एका निर्णयाने कार्यक्षमता दुपटीने वाढणार

Last Updated:

Pune Railway Station: पुणे स्टेशनवर सध्या 6 प्लॅटफॉर्म असून त्यावरून 210 रेल्वे गाड्यांची ये-जा सुरू असते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. पुण्यात नोकरी आणि शिक्षणानिमित्त राहणाऱ्या परप्रांतियांची संख्या देखील जास्त आहे. हे लोक प्रवासासाठी प्रामुख्याने रेल्वेचा वापर करतात. त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनवर नेहमीच गर्दी असते. या गर्दीला सामावून घेण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनचा विस्तार केला जाणार आहे. स्टेशनचं नूतनीकरण करण्यात येत असून नवीन 6 प्लॅटफॉर्म बांधले जाणार आहेत.
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्टेशन कात टाकणार! रेल्वे बोर्डाच्या एका निर्णयाने कार्यक्षमता दुपटीने वाढणार
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्टेशन कात टाकणार! रेल्वे बोर्डाच्या एका निर्णयाने कार्यक्षमता दुपटीने वाढणार
advertisement

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशनवर सध्या 6 प्लॅटफॉर्म असून त्यावरून 210 रेल्वे गाड्यांची ये-जा सुरू असते. 72 गाड्या पुण्यातून सुटतात. या स्टेशनवर दररोज 160000 प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे आणखी 6 प्लॅटफॉर्म बांधले जाणार आहेत. त्यामुळे पुणे स्टेशनवर एकूण 12 प्लॅटफॉर्म तयार होतील. सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक सात आणि आठला मंजुरी मिळाली आहे. इतर प्लॅटफॉर्मसाठी पाठवलेल्या प्रस्तावावर प्रक्रिया सुरू आहे. त्यांना देखील लवकरच मंजुरी मिळेल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

advertisement

Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात वारं फिरलं, पुण्यासह 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट

पुणे स्टेशनवर प्रवासी आणि रेल्वे गाड्यांची संख्या वाढत आहे. पण, उपलब्ध पायाभूत सुविधा कमी पडत आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्मची संख्या वाढवण्याचं नियोजन गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. आता या कामाला गती मिळाली आहे. रेल्वे मंत्र्यांनी दोन प्लॅटफॉर्म वाढवण्याची सूचना दिली होती. पार्सल विभागाशेजारी मोकळ्या जागेत नवीन चार प्लॅटफॉर्मचा प्रस्ताव पुणे रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे बोर्डाला पाठवण्यात आला आहे.

advertisement

पुणे स्टेशनवर मुंबईच्या दिशेने असलेल्या वॉर्डात रेल्वे गाड्या थांबून ठेवण्यासाठी खास रूळ आहेत. तेथे रेल्वे गाड्या पार्क केल्या जातात. तेथील चार 'स्टेबलिंग लाइन' काढून त्या जागेत नवे चार प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार आहे. तसेच सर्व प्लॅटफॉर्म 24 डब्यांच्या गाड्यांना पुरेल एवढे मोठे असणार आहेत.

रेल्वे स्टेशनच्या नूतनीकरणासाठी किती महिन्यांचा कालावधी लागणार आहे. कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचे, स्टेशनवर किती प्लॅटफॉर्म प्रवाशांसाठी सुरू ठेवायचे, इलेक्ट्रिक इंटर लॉकिंगचं काम व इतर कामाचं शेड्यूल करण्यासाठी बांधकाम, इलेक्ट्रिक व इतर विभाग एकत्रित बैठक घेणार आहे.

advertisement

होणारा फायदा

पुणे स्टेशनवरून सुटणाऱ्या व धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ होईल. पुणे शहराची अन्य शहरांशी धावणाऱ्या गाड्यांची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. प्रवासी गाड्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध असल्यामुळे स्टेशनवर लवकर प्रवेश मिळेल. प्रवाशांच्या वेळेत बचत होऊन गर्दीचं विभाजन होईल.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्टेशन कात टाकणार! रेल्वे बोर्डाच्या एका निर्णयाने कार्यक्षमता दुपटीने वाढणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल